Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: लग्नासाठी राज्य सरकार करतंय ५१००० रुपयांची मदत, काय आहे योजना, कसा घ्याल लाभ?

Mukhyamantri Samuhik Vivah Yojana: सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असतात. सरकार मुख्यमंत्री सामूहिक योजनेअंतर्गत गरीब वधूंना लग्नासाठी ५१ हजार रुपयांची मदत करते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशातील नागरिकांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. सरकारच्या योजनेतून नागरिकांना आर्थिक मदत मिळते. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन या योजना राबवल्या जातात. गरीब आणि गरजू लोकांसाठी या योजना राबवल्या जातात. सरकारची अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना ही लग्नासाठी आर्थिक मदत मिळवून देते. लग्नासाठी सरकारकडून ५१ हजार रुपये दिले जातात. गरीब लोकांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारची ही खास योजना आहे. ५१ हजार ही रक्कम ३ टप्प्यांमध्ये दिली जाते.

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत सरकार लग्नासाठी पात्र असलेल्या गरीब वधूंच्या खात्यात ही रक्कम जमा करते. यात पहिल्या टप्प्यात ३१ हजार रुपये जमा केले जातात. त्यानंतर १०,००० रुपये लग्नासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर खर्च केले जातात. उरलेले ६ हजार रुपये लग्नासाठी लागणाऱ्या सजावटींवर खर्च केले जातात. या योजनेचा लाभ गरीब मुलींनाच मिळतो.

योजनेसाठी पात्रता

मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना ही उत्तर प्रदेश राज्य सरकारची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नववधू- वराचे आईवडिला उत्तर प्रदेशचे असणे भाग आहे. याचसोबत त्यांचे उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त नसावे. या योजनेत अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी समाजातील लोक लाभ घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र सादर करावे लागते. योजनेचा लाभ घेण्यासाठी वधूचे वय १८ वर्ष आणि वराचे वय २१ वर्ष असणे आवश्यक आहे. या योजनेत सामूहिक विवाहसोहळ्यात लग्न केले जाते.

उत्तर प्रदेशप्रमाणेच मध्य प्रदेशातदेखील अशीच एक योजना सुरु आहे. गरजू लोकांना लग्नासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री कल्याणी विवाह सहाय्य योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत २ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'टिकली' ड्रग्जचा विद्यार्थ्यांना विळखा, नागपूरच्या कॉलेजेसमध्ये 'LSD'चा धुमाकूळ

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT