Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज; काय आहे योजना?

PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेत तुम्हाला कोणत्याही गॅरंटीशिवाय कर्ज मिळणार आहे. तुम्हाला ३ लाखांचे कर्ज मिळणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारने स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा त्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरु केली आहे. पीएम विश्वकर्मा असं या योजनेचं नाव आहे. २०२३ मध्ये ही योजना सुरु केली आहे. या योजनेत लाखो नागरिकांनी लाभ घेतला आहे.

पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana)

स्वतः चा व्यवसाय करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे, या उद्देशाने पीएम विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. या योजनेत नागरिकांना ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळते. कोणत्याही गॅरंटीशिवाय हे कर्ज दिले जाते. जेणेकरुन त्यांना काही अडचण येऊ नये.

पीएम विश्वकर्मा योजनेत नागरिकांना स्किल ट्रेनिंगदेखील दिले जाते. यामध्ये १८ ट्रेडमधील नागरिकांना कर्ज दिले जाते. यामध्ये लोहार, मूर्तिकार, धोबी अशा क्षेत्रात काम करणाऱ्यांचा समावेश आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेत नागरिकांना लोनसोबतच स्किल ट्रेनिंगदेखील दिले जाते. त्यांनी व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत ट्रेनिंगच्या कालावधीत ५०० रुपये स्टायपेंडदेखील दिली जाते. या योजनेत सुरुवातीला १ लाख रुपये दिले जातात. त्यानंतर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी २ लाख रुपये दिले जातात. एकूण ३ लाखांची मदत केली जाते.

या योजनेसाठी १८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला www.pmvishwakarma.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या योजनेचा लाभ घेतल्यावर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. तुमचेही स्कील अजून चांगले होतील. त्याचसोबत व्यवसायासाठी कर्जदेखील मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Court Fine: प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा झटका, ग्राहक आयोगाने ठोठावला ४.२५ लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: राज्य सरकार विरोधात सोलापुरात हजारोच्या संख्येने शिक्षक उतरले रस्त्यावर

Monsoon Health: पावसाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT