Job Vacancy Saam TV
बिझनेस

Sarkari Naukri : सरकारी नोकरीची संधी, या ३ ठिकाणी निघाली बंपर भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी?

Sarkari Job Update : कोणत्याही सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना आधी अर्ज प्रक्रिया पूर्ण वाचा. त्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घ्या. त्यानुसारच अर्ज करावा.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Sarkari Jobs in India : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. अनेक विभागात भरती निघाली आहे, ज्यामध्ये तुम्ही पात्र असाल किंवा तुमच्या आवडीच्या ठिकाणी अर्ज करू शकता. पण त्याआधी अधिकृत नोटिफिकेशन वाचून सर्व माहिती जाणून घ्या अन् मगच अर्ज करावा. आयकर विभाग, सीआयएसएफ आणि काही सरकारी बँकमध्ये नोकरी निघाला आहे. पात्रता आणि आवडीप्रमाणे तुम्ही अर्ज करू शकता.

CISF मध्ये भरती

CISF द्वारे कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. CISF द्वारे तब्बल ११६१ जागांवर भरती निघाली आहे, त्यासाठी ३ एप्रिलपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणं अनिवार्य आहे. एक ऑगस्त २०२५ पर्यंत अर्जदाराचे वय १८ ते २३ वर्ष इतके असावे.

बँक ऑफ बडोदा, ५१८ जागा -

बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट अधिकाऱ्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. २१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. बँक ऑफ बडोदामध्ये वेगवेगळ्या पदासांठी ५१८ जागांवर भरती निघेल. अर्ज करण्याआधी बँकेकडून निघालेली अधिकृत जाहिरात वाचावी.

आयकर विभाग -

आयकर विभागात मल्टी-टास्किंग स्टाफ, टॅक्स असिस्टंट आणि स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करू शकता. आयकर विभागाकडून अधिकृत जाहीर निघाली आहे. पाच एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. आयकर विभागात ५६ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. २५ हजार ते ८१ हजार पर्यंत वेतन असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT