Petrol-Diesel Price : saam tv
बिझनेस

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डीझेलच्या दरात मोठी कपात; सरकारने आकडेवारी सांगत समजावलं 'किमतींचं गणित'

Petrol-Diesel Price : जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या असताना भारतात मात्र या दरांमध्ये ३.१ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.

Bharat Jadhav

  • भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर ३.१ टक्क्यांनी घटल्याचा केंद्र सरकारचा दावा.

  • मे २०२२ ते मे २०२६ या कालावधीतील आकडेवारी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जाहीर केली.

  • जगभरात इंधन दर वाढले असताना भारतात दर कमी झाल्याचे सरकारचे म्हणणे

देशातील नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी हाती आली. देशात इंधनाचे दर कमी झाले आहेत. इराण आणि अमेरिकेमधील तणावामुळे भारतासह अनेक देशांना इंधन दरवाढीचा सामना करावा लागला होता. पेट्रोल-डिझेलची टंचाई आणि दरवाढीमुळे देशातील जनतेत नाराजी होती. परंतु आता हाती आलेल्या बातमीमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

जगभरातील विविध देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना भारतात इंधनाचे दर ३.१ टक्क्यांनी कमी झाले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२२ ते मे २०२६ या कालावधीत भारतात इंधनाचे दर ३.१ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत दर वाढले

आकडेवारीचा संदर्भ देत केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, गेल्या चार वर्षांत पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. श्रीलंकेत या किमती ६६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर इटली आणि फ्रान्समध्ये अनुक्रमे ४६ टक्के आणि ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेतही इंधनाच्या किमती ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. याउलट भारतात मात्र किमती सातत्याने कमी झाल्या आहेत. या चार वर्षांच्या कालावधीत भारतात इंधनाच्या किमतीत ३.१ टक्क्यांची निव्वळ घट नोंदवली गेली आहे.

३.१ टक्क्यांनी दरात घसरण

सरकारने स्पष्ट केले की, पश्चिम आशियातील अलीकडील तणावामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७० डॉलरवरून १२२ डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. या दरवाढीचा फटका जनतेला बसू नये म्हणून सरकारने वेळोवेळी विविध उपाययोजना केल्या आहेत. उदाहरणार्थ, पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) प्रति लिटर ३ रुपयांची कपात करणे आणि डिझेलवरील शुल्क शून्य करणे.

जागतिक स्तरावरील किमतींमधील चढ-उतारांमुळे होणाऱ्या धक्क्यापासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी, सरकारने करकपातीद्वारे स्वतःवर १ लाख कोटी रुपयांहून अधिकचा वार्षिक महसुली बोजा स्वीकारला आहे. तसेच देशांतर्गत किरकोळ बाजारात इंधनाचे दर वाढू नयेत यासाठी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमधील अस्थिरतेच्या काळात सरकारी तेल कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणावर 'अंडर-रिकव्हरीज'चा (खर्चाच्या तुलनेत कमी प्राप्तीचा) भार सोसावा लागत असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

SCROLL FOR NEXT