Ladki Bahin Yojana July instalment payment update : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील कोट्यवधी पात्र भगिनींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याच्या हप्त्याची १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात टप्प्या टप्प्याने १५०० रूपयांचा लाभ जमा होणार आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 'रक्षाबंधना'च्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असे सांगितले होते. जुलै महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांसाठी राज्य सरकारने तब्बल ३१९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग (वितरित) केला आहे.
पात्र महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. योजनेच्या पडताळणीनंतर आता एक कोटी ६६ लाख बहिणी पात्र ठरल्या आहेत.
२८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्यापूर्वी हा निधी वितरित करण्यासाठी हा निधी वर्ग केला आहे. पात्र लाभार्थीना महिन्याला अडीच हजार कोटी रुपये निधी लागतो. यंदाच्या आर्थिक वर्षात योजनेच्या अनुसूचित जाती घटकासाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
निधीचे वितरण आणि खर्च करताना संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी काटकसरीच्या उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे. मंजूर आराखड्यानुसार उपलब्ध निधी याच आर्थिक वर्षात खर्च होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. निधीचा वापर झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.