IAS IPS DA Hike saam tv
बिझनेस

DA Hike : IAS-IPS अधिकाऱ्यांची चांदी! DA मध्ये 3% वाढ, जुलैपासूनची थकबाकीही मिळणार रोख

IAS IPS Officers DA Hike : छत्तीसगड सरकारने IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांची वाढ केली आहे. आता ६३ टक्के DA मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात कार्यरत IAS, IPS यांच्यासोबत अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात(DA) ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांना ६० टक्क्यांऐवजी ६३ टक्के महागाई भत्ता मिळेल. राज्य सरकारने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. विशेष म्हणजे, वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२६ पासून लागू होण्याची शक्यता असून, जुलैपासूनची थकबाकीही अधिकाऱ्यांना रोख स्वरूपात दिली जाईल.

महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांवर

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकानेही अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ केली होती.

अखिल भारतीय सेवा महागाई भत्ता नियम, १९७२ मधल्या तरतुदींनुसार ही वाढ राज्यात कार्यरत IAS, IPS आणि इतर अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांनाही लागू करण्यात आली.

१ जुलैपासून मिळणार वाढीव DA

नव्या आदेशानुसार, वाढीव महागाई भत्त्याचा लाभ १ जुलै २०२६ पासून मिळणार आहे. त्यामुळे जुलैपासून आतापर्यंतची थकबाकी संबंधित अधिकाऱ्यांना मिळेल. ही थकबाकी रोख स्वरूपात म्हणजेच कॅळने दिली जाणार आहे.

वेतन पावत्यांमध्ये बदल करण्याचे निर्देश

राज्य सरकारने संबंधित कार्यालयांना वेतन पावत्यांमध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या कार्यालयातून संबंधित अधिकाऱ्यांचं वेतन काढलं जात होतं, त्याच कार्यालयामार्फत थकबाकीचे पैसे दिले जाणार जातील. तसेच याआधी दिलेल्या रकमेचा समावेश करून वाढीव महागाई भत्ता देण्यात येईल.

जास्त पैसे मिळाल्यास होणार वसुली

सरकारने या आदेशात एक महत्त्वाची अटही घातलेली आहे. एखाद्या अधिकाऱ्याला नियमानुसार मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त पैसे दिले तर, जास्तीची रक्कम संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात चाहत्यांची तुफान गर्दी; जागा मिळेना म्हणून थेट झाडावर चढले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: मुंबईकरांनो कचरा मिक्स केला तर खिशाला फटका, मुंबईकरांसाठी महापालिकेचे नवे नियम

Sleeping direction: रात्री झोपताना डोकं कोणत्या दिशेला असावं? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, नाहीतर घरी येईल गरीबी

Kitchen Vastu Tips: किचनमध्ये फ्रीज आणि झाडू कुठे ठेवताय? योग्य दिशा माहितीये का? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा २७८० रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT