DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता वाढणार, १ जुलैपासून होणार लागू

DA Hike From July 2025: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ जुलैपासून महागाई भत्ता लागू होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता ५८ टक्के होऊ शकतो.

Siddhi Hande

केंद्र सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देणार आहे. १.२ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. जुलै २०२५ मध्ये महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलै ते डिसेंबरसाठीच्या महागाई भत्ता २ टक्क्यांवरुन ३ टक्के होई शकतो. याची घोषणा कदाचित जुलै महिन्यात होऊ शकतो.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या जो महागाई भत्ता मिळत आहे तो जानेवारी २०२५ पासून लागू आहे. जर महागाई भत्त्यात वाढ झाली तर तो ५७ टक्क्यांवरुन ५८ टक्के करण्यात येईल.

महागाई भत्ता काय आहे? (What Is Dearness Allowance)

महागाई भत्ता हा सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देतो. महागाईमुळे होणाऱ्या खर्च थोडाफार कमी व्हावा, यासाठी हे पैसे दिले जातात. वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याचे पैसे वाढवले जातात. जानेवारी ते जुलैच्या महागाई हप्त्याची घोषणा मार्चमध्ये होते. तर जुलै आणि डिसेंबरच्या महागाई भत्त्याची घोषणा नोव्हेंबर महिन्यात होते. यावर्षी ही घोषणा कधी होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.

महागाई भत्ता किती वाढणार? (DA Hike)

महागाई भत्ता हा CPI-IW (Consumer Price Index For Industrial Workers)द्वारे ठरवला जातो. हा इंडेक्स तुम्हाला किती रुपये महागाई भत्ता किती वाढ करावी लागणार याची माहिती देतो. यावेळी महागाई भत्त्यात एक टक्क्यांनी वाढ होऊ शकते. हा आकडा मे आणि जूनच्या PI-IW वर निर्भर असेल. त्यामुळे यावेळी महागाई भत्ता ५८ टक्के होऊ शकतो.

८वा वेतन आयोग कधी लागू होणार?

केंद्रीय कर्मचारी आठवा वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. १ जानेवारीपासून ८व्या वेतन आयोगाची शिफारसे लागू केली जाईल. परंतु या वेतन आयोगाबाबत घोषणा कधी होणार, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi Bhavishya: कुंभ राशीच्या व्यक्ती कशा असतात? जाणून घ्या त्यांच्या भविष्याविषयी

महाराष्ट्रात आणखी एक लव्ह जिहाद प्रकरण उघडकीस; नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, नागरिकांमध्ये संतापाची लाट

PNB Recruitment: पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच करा अर्ज

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पेरू बागेला फटका

Vinod Suryavanshi : "सिलेक्शननंतर शूटिंगसाठी सेटवर गेलो, पण डायरेक्टरने रंग पाहून घरी पाठवलं", 'पंचायत' फेम अभिनेत्याने सांगितला भयंकर किस्सा

SCROLL FOR NEXT