EPFO New Rule Google
बिझनेस

EPFO Rule: EPFO सदस्यांसाठी खुशखबर! PF काढण्यासाठी ATM कार्ड या तारखेपासून मिळणार

EPFO Rule: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आता एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार आहेत. या महिन्यापासून कर्मचाऱ्यांना एटीएम कार्ड मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. कर्मचारी हा ईपीएफओचे सदस्य असतात. ईपीएफओने मोठी घोषणा केली आहे. ईपीएओ लवकरच पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड तयार करणार आहे. त्याचसोबत मोबाईल अॅपदेखील लाँच करणार आहे. मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ईपीएफओ लवकरच एटीएम कार्ड लाँच करणार आहे. पीएफचे पैसे काढण्यासाठी हे एटीएम कार्ड वापरले जाणार आहे. याचसोबत मोबाईल अॅपदेखील वापरु शकतात. मनसुख मांडविया यांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे मोबाईल अॅप आणि डेबिट कार्ड हे मे-जूनपर्यंत सुरु केले जाईल. (EPFO New Rule)

EPFO 2.0 ची आयटी प्रणाली अपग्रेड केली जाईल. EPFO 3.0 मे- जून २०२५ पर्यंत लाँच केले जाईल. या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना बँकिंग सेवा मिळू शकणार आहे. यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने पीएफचे पैसे काढू शकणार आहे. (Employees will Get ATM Card Under EPFO)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना आता बँकिंग सुविधा मिळणार आहे. कोणत्याही ठिकाणावरुन म्हणजे एटीएममधून ही सुविधा उपलब्ध होईल, या खात्री करण्यासाठी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेत चर्चा सुरु आहे. ही नवीन सुविधा लागू झाल्यावर ईपीएफओ सदस्य एटीएम कार्ड वापरु शकणार आहे.

पैसे काढण्याची मर्यादा (Cash Withdrawl Limit)

ईपीएफओ कर्मचारी आता लवकरच एटीएम कार्डच्या माध्यमातून पैसे काढू शकणार आहे. परंतु पीएफचे संपूर्ण पैसे तुम्हाला काढता येणार नाही. पैसे काढण्यासाठी काही मर्यादा लागू केली जाईल.मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

EPF सदस्यांसाठी बँकिंग अॅप (Mobile Bank App For EPF Employees)

मोबाईल बँकिंग अॅप हे ईपीएफ खातेधारकांसाठीही तयार केले जाणार आहे. या अॅपमध्ये तुम्ही पेन्शन, पीएफ, मासिक योगदान याबाबत सर्व माहिती पाहू शकतात. तुम्ही बँकेच्या अॅपवर सर्व माहिती पाहू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT