Edible Oil Price Latest News Saam TV
बिझनेस

Edible Oil Price: खिशाला बसणारी फोडणी थांबणार! मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे खाद्यतेल झालं स्वस्त

Edible Oil Price Updates (27Jul): महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Edible Oil Price Updates:

महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. रिफाइंड सोयाबीन तेल आणि आरबीडी पामोलिअनच्या किमती गेल्या वर्षभरात लक्षणीयरीत्या घसरल्या आहेत.

त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आवश्यक दिलासा मिळाला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिफाइंड सूर्यफूल तेल २९% तर रिफाइंड सोयाबीन तेल १९ टक्क्यांनी आणि पामोलिन तेल २५ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.

केंद्र सरकार खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमतींवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राज्यमंत्री साध्वी निरंजन यांनी लोकसभेत याबाबत लेखी उत्तरात माहिती दिली आहे. किरकोळ किमतींवरील बचतीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकार सतत प्रयत्न करत आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.

याशिवाय आंतरराष्ट्रीय किमतीतील कपातीच्या बरोबरीने देशांतर्गत किमती निश्चित करण्यासाठी सरकार उद्योग नेते आणि संस्थांशी चर्चा करत आहे. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात देशांतर्गत किमती कमी करण्यासाठी सरकारने आयात शुल्क कमी केले आहे, त्यामुळेच हा फायदा झाला असंही ते म्हणाले.

दरम्यान, परिष्कृत सूर्यफूल तेल, रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड पामोलिन तेलाच्या किमती अनुक्रमे २९.०४ टक्के, १८.९८ टक्के आणि २५.४३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. अशी माहिती सुद्धा राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील विजेची मागणी २५ हजार मेगावॉटच्या उंबरठ्यावर

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

SCROLL FOR NEXT