8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात १९००० रुपयांनी वाढणार पगार; रिपोर्ट आला समोर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचापगार १४ ते १९ हजार रुपयांपर्यंत वाढू शकते.

Siddhi Hande

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ८ व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचा पगार किती होणार याबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. आठव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार १४००० ते १९००० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

आठव्या वेतन आयोगाबाबत Goldman Sachs चा रिपोर्ट समोर आला आहे.यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या सिमितीची स्थापना एप्रिल २०२५ मध्ये होईल. यानंतर २०२६ किंवा २०२७ मध्ये शिफारशी लागू होणार आहे.

पगार किती वाढणार? (How Much Salary Hike Under 8th Pay Commission)

ज्या कर्मचाऱ्यांचा पगार सरासरी १ लाख रुपये आहे. त्यांच्या पगारात सरासरी १४-१९ टक्क्यांनी वाढ होणार आहे.

जर तुमचा पगार १.७५ लाख रुपये असेल तर तुमच्या पगारात १४,६०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जर सरकारने आठव्या वेतन आयोगावर २ लाख कोटी रुपये खर्च केले तर कर्मचाऱ्यांच्या पगारात १६,७०० रुपयांनी वाढ होईल. जर सरकारने २.२५ लाख कोटी रुपये खर्च केले तर पगारात १८,८०० रुपयांनी वाढ होईल.

आठव्या वेतन आयोगाचा फायदा ५० लाखपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. ६५ लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांना पेन्शन मिळणार आहे. मागच्या वेळी १.०२ लाख कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर यावेळी जास्त खर्च करण्याची शक्यता आहे.

सातव्या वेतन आयोगात फिटमेट फॅक्टर २.५७ होता. यामुळे बेसिक सॅलरी ७००० रुपयांवरुन १८०० रुपये झाली होती. जर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर तसाच ठेवला तर वेतन ४६,२६० रुपये होणार आहे. काही रिपोर्टनुसार फिटमेंट फॅक्टर १.९२ होऊ शकते. यामुळे बेसिक सॅलरी ३४,५६० रुपयांपर्यंत वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

SCROLL FOR NEXT