EPF Interest 2025-26 google
बिझनेस

EPFO Update: PF खात्यावर ८.२५ टक्के व्याज जमा होण्यास सुरूवात, तुम्हाला मिळाले का? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

EPF Interest 2025-26 : ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. १५ जुलैपर्यंत सदस्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा होणार असून पासबुक ऑनलाइन तपासता येणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या लाखो सदस्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी निश्चित करण्यात आलेले ८.,२५ टक्के व्याज सदस्यांच्या पीएफ खात्यात १५ जुलै २०२६ पर्यंत जमा होणार आहे. ही माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

ईपीएफओ कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून व्याज जमा होण्याची वाट पाहत होते. आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व सदस्यांच्या खात्यात व्याज जमा केलं जाणार आहे.

८.२५ टक्के व्याज कसं मिळत?

EPFO दरवर्षी आर्थिक वर्षासाठी व्याजदर जाहीर करतं. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदर निश्चत करण्यात आलं आहे. सदस्यांच्या पीएफ खात्यात वर्षभर असलेल्या शिल्लक रकमेच्या आधारावर हे व्याज मोजलं जाणार आहे. जुन्या कर प्रणालीअंतर्गत, आयकर कायद्यातले कलम ८० C नुसार ठरावीक अटी पूर्ण केल्याने पीएफवरचे व्याज टॅक्सफ्री राहतं.

१५ जुलैपर्यंत खात्यात व्याज

मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, EPFO ने आर्थिक वर्ष २०२५-२६ चे व्याज सजस्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आवश्यक पडताळणीनंतर हे व्याज १५ जुलै २०२६ पर्यंत पासबुकमध्ये दिसायला सुरुवात होईल.

पीएफ पासबुक कसं तपासाल?

तुमच्या पीएफ खात्यात जमा व्याज पाहायचं असेल तर सर्वात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा. मग View या ऑप्शनवर क्लिक करून Passbook निवडा. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. पुढे तुम्हाला Member ID हा पर्याय दिसेल तिथेच View Passbook वर क्लिक करा. त्यानंतर संपूर्ण व्यवहारांचा तपशील आणि जमा झालेलं व्याज पाहता येईल.गरज असल्यास Download PDF या पर्यावरून तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT