सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीच्या काळात आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) एकूण ५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा राज्यातल्या २ लाख ७५ हजार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार असल्याचं वृत्त आहे. याशिवाय, चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचा जास्तीचा एरियर रक्कमही दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री सुक्खू यांनी केलेल्या घोषणेनुसार, महागाई भत्त्यातल्या वाढीमुळे चालू वर्षातले ४ टक्के वाढ आणि मागच्या वर्षातल्या थकीत १ टक्के महागाई भत्त्याचा समावेश आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकूण ५ टक्क्यांची वाढ होणार आहे.
या निर्णयासंदर्भातल्या सूचना शुक्रवारी जारी केल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महागाई भत्त्यातल्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच वाढीव DA चा लाभ पेन्शनधारकांनाही मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारचा या घोषणेतला महत्त्वाचा निर्णय म्हणजे, चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना मिळणारी जास्तीची आर्थिक मदत.DA वाढीसोबतच या कर्मचाऱ्यांना रिव्हिजन एरियर म्हणून १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम १ नोव्हेंबर रोजी संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.