DA Hike meta ai
बिझनेस

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट? डीए वाढीबाबत मोठी अपडेट

DA Increase 2026 : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै २०२६ पासून ३ टक्के डीए वाढीची अपेक्षा आहे. यामध्ये थकबाकी किती मिळू शकते

Sakshi Sunil Jadhav

दिवाळीनिमित्त पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी आणि बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता (DA) वाढीची वाट पाहतायेत. यंदा डीएमध्ये ३ टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना १४.२५ टक्के बोनस जाहीक केला आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी जास्त गोड होणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ३ टक्के डीए वाढीची अपेक्षा

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा सध्याचा महागाई भत्ता ६० टक्के असल्याचं गृहीत धरल्याने, त्यात ३ टक्के वाढ झाल्यानंतर तो ६३ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. या वाढीचा फायदा १.२ कोटी कर्मचारी आणि रिटायरमेंटधारकांना होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारची अधिकृत घोषणा आणि मंजुरी अद्याप निश्चित झालेली नाही.

तीन महिन्यांची थकबाकी मिळणार?

डीए वाढीला १ जुलै २०२६ पासून पूर्वलक्ष्मी प्रभावाने मंजुरी मिळाल्यावर, नियमानुसार कर्मचाऱ्यांना जुलैपासूनची थकबाकी मिळू शकते. मात्र, प्रत्यक्ष थकबाकी किती मिळेल, हे अधिकृत निर्णय आणि आदेशावर अवलंबून असेल.

उदाहरणार्थ, ३५,४०० रुपये बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्याला डीएमध्ये ३ टक्के वाढ झाल्याने दरमहा १,०६२ रुपये जास्त मिळू शकतात. तीन महिन्यांची थकबाकी ३,१८६ रुपये होईल. चार महिन्यांची थकबाकी मोजल्याने ही रक्कम ४,२४८ रुपये होईल.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १४.२५ टक्के बोनस

दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांसाठी १४.२५ टक्के बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या दिवसात दिलासा मिळणार आहे. बोनसची प्रत्यक्ष रक्कम कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नियमांनुसार आणि संबंधित गणनेनुसार ठरेल.

डीए वाढीच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष

केंद्र सरकारी कर्मचारी आणि रिटायरमेंटधारकांचं लक्ष आता डीए वाढीच्या अधिकृत घोषणेकडे लागलं आहे. ३ टक्के वाढ मंजूर झाल्याने मासिक पगार आणि महागाई सवलतीत वाढ होऊ शकते. मात्र, घोषणा होण्याआधी वाढ निश्चित झाल्याचं किंवा थकबाकी खात्यात जमा होणार असल्याचे समजणे योग्य ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hand Sweating Problem: हाताला घाम का येतो? शरीरात नेमकं काय घडतं तेव्हा असं होतं?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एकाला अटक; हरियाणा कनेक्शन उघड

Maharashtra News Live Update: बीडमध्ये दोन दसरा मेळावे; मनोज जरांगे आणि मुंडे बंधूंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष

Vastu Tips : रात्री कपडे धुण्याची सवय आहे? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कपडे धुण्याची योग्य वेळ

Gold Rate Today: दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ८,७०० रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT