Gold Silver Rate (18th December 2023) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (18th December 2023): सोन्याचा भाव गगनाला, चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचे दर

Today's (18th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: मागच्या काही दिवसांपासून सोन्याचा वाढता आलेख पाहाता खरेदीदारांच्या नाकी नऊ आले आहेत. सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी नोंदवली आहे. सोनं खरेदीसाठी किती पैसे आज मोजावे लागतील जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (18th December 2023):

सोन्याचे भाव प्रत्येक दिवशी बदलत असतात. दिवाळीनंतर सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांचा कल हा खरेदीसाठी कमी पाहायला मिळाला आहे. अशातच सोनं खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे.

नवीन वर्षात सोनं (Gold) ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्याचा वाढता आलेख पाहाता खरेदीदारांच्या नाकी नऊ आले आहेत. सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी नोंदवली आहे.

शनिवारी गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार २४ कॅरेटनुसार ६२,६६० रुपये इतके होता तर आज यामध्ये ११० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. अशातच सोन्याचा आजचा भाव ६२, ७७० रुपये इतका आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७५५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,७७० रुपये मोजावे लागणार आहे. सोन्याच्या भावात आज ११० रुपयांनी वाढ झाली. तसेच चांदीच्या किमतीही (Price ) वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,००० रुपये मोजावे लागतील. आज चांदीतही १०० ग्रॅमसाठी ३० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?

  • मुंबई - ६२,६२० रुपये

  • पुणे - ६२,६२० रुपये

  • नागपूर - ६२,६२० रुपये

  • नाशिक - ६२,६५० रुपये

  • ठाणे - ६२,६२० रुपये

  • अमरावती - ६२,६२० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope: आजचा शुभ दिवस देणार बरंच काही; वाचा तुमचे राशीभविष्य

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT