Gold Silver Rate (15th January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (15th January 2024): मकर संक्रांतीला सोन्याच्या दरात वाढ, चांदीही चकाकली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Today's (15th January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: ऐन लग्नसराई सुरु होण्यापूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (15th January 2024 ):

नवीन वर्षातील आणि पौष महिन्यातील पहिला सण मकर संक्रांती. या महिन्यात सोनं खरेदीचा कल ग्राहकांमध्ये अधिक प्रमाणात असतो. खरेतर पौष महिन्यात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे सोन्या-चांदीचे भाव साधरणत: कमी होतात.

अशातच ऐन लग्नसराई सुरु होण्यापूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मागील वर्षात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती.

आज सोन्याच्या (Gold) किमतीत जागतिक पातळीवर वाढ होताना दिसत आहे. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत (Price) 0.30 टक्के किंवा $6.10 च्या वाढीसह $2057.70 प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली. तर सोन्याच्या जागतिक स्पॉट किमतीतही वाढ झाली आहे. प्रति औंस $ 2054.11 वर व्यापार करत आहे. जाणून घेऊया आजचे दर

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८३० रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात १५० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,५९० रुपये मोजावे लागतील. २४ कॅरेटसाठी १७० रुपये जास्तीचे मोजावे लागतील.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,८०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत प्रति किलोत ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,४४० रुपये

  • पुणे - ६३,४४० रुपये

  • नागपूर - ६३,४४० रुपये

  • नाशिक - ६३,४७० रुपये

  • ठाणे - ६३,४४० रुपये

  • अमरावती - ६३,४४० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT