Gold Silver Rate (8th January 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (8th January 2024): सोन्याचा भाव गडगडला, चांदीचा भाव उतरला; जाणून घ्या आजचा दर

Today's (8th January 2024) Gold Silver Rate In Maharashtra: सोमवारी सोन्याच्या भावात घट झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षात सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळाले.परंतु, आज सोन्या-चांदीच्या किमती स्थिर पाहायला मिळाल्या.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (8th January 2024 ):

सोमवारी सोन्याच्या भावात घट झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षात सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळाले.परंतु, आज सोन्या-चांदीच्या किमती स्थिर पाहायला मिळाल्या.

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यानंतर सोन्या (Gold)-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मौल्यवान धातूत घट झालेली असली तरी ग्राहकांना खरेदीसाठी प्रतितोळा जास्तीचे पैसे (Money) मोजावे लागणार आहे.

येत्या वर्षात सोन्याचा भाव हा ७२ हजार तर चांदीचा (Silver) दर ९० हजारांचा टप्पा ओलांडू शकतो. असे मत व्यापाऱ्यांनी मांडले आहे. फेडरल रिझर्व्हच्या नव्या धोरणामुळे जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम दिसून येत आहे.

सोन्याच्या वाढत्या दराचा परिणाम ग्राहकांसह ज्वेलर्सच्या दुकानावर देखील पाहायला मिळत आहे. यामुळे सोने खरेदीदारांचा कल हा कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस $2,058 च्या जवळपास आहे. जाणून घेऊया मुंबई (Mumbai) -पुण्याचा आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७९५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,२०० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात २२० रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,४०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,०५० रुपये

  • पुणे - ६३,०५० रुपये

  • नागपूर - ६३,०५० रुपये

  • नाशिक - ६३,३०० रुपये

  • ठाणे - ६३,०५० रुपये

  • अमरावती - ६३,०५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Kofta Recipe: घरीच बनवा कुरकुरीत पालक कोफ्ते; चव चाखून विसराल हॉटेलची डिश

Maharashtra Live News Update : अंबादास दानवे यांनी घेतली संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट

Putin india tour : पुतिन यांच्या भारत दौऱ्याने काय मिळणार? या क्षेत्रात होणार फायदा, ८ महत्वाचे करार गेमचेंजर ठरणार?

मार्केट होणार जॅम! Maruti Suzuki e-Vitara लॉन्च; ५०० किमीची रेन्ज अन् ५ हायटेक फीचर्स

नागपूर हादरलं! मुलीच्या डोक्याला दुखापत, मुलाच्या छातीवर शस्त्रानं वार; नंदनवन कॉलनीतील 'त्या' खोलीत जोडप्यासोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT