Gold Silver Price Today  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; खरेदी करण्याआधी वाचा आजचे दर

Gold Silver Rate 6th June 2024: सोने चांदीचे नवे दर जाहीर झाले आहे. सोने चांदीच्या दरात काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचे भाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशात रोज सोने-चांदीचे भाव बदलत असतात. मागील काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ- उतार होताना दिसत आहे. अशातच काल सोने-चांदीच्या किंमतीत घट झाली होती. मात्र, आज सोने चांदीच्या किंमतीत फार बदल झालेला नाही. सोने-चांदीचे भाव स्थिर आहेत.

सोने चांदीचे भाव

देशात आज २२ कॅरेट सोने प्रति तोळा ६६,५९० रुपयांनी विकले जात आहे. तर १ ग्रॅम सोन्याची किंमत ६,६५९ रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत ६,६५,९०० रुपये आहे. कालच्या तुलनेत फक्त १०० रुपयांनी सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

देशात आता २४ कॅरेट सोने प्रति तोळा ७२,६४० रुपयांना विकले जात आहे. तर १ ग्रॅम सोने ७,२६४ रुपयांना विकले जात आहे. १०० ग्रॅम सोन्याची किंमत फक्त १०० रुपयांनी कमी झाली आहे. २४ कॅरेटचं १०० ग्रॅम सोने ७,२६,४०० रुपयांना विकले जात आहे.

चांदीचे भाव

देशभरात चांदीच्या भावात फारसा बदल झालेला नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या किंमती कमी होतील, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मात्र, आज चांदीच्या किंमतीत फारसा बदल झालेला नाही.

देशभरात १ ग्रॅम चांदी ९१.६० रुपयांना विकली जात आहे. १०० ग्रॅम चांदीची किंमत ९,१७० रुपये आहे. तर १ किलो चांदीची किंमत ९१,६०० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT