Gold Silver Rate Hike 2023 Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate Hike 2023 : वर्षभरात सोनं किती रुपयांनी महागलं? वाचा एका क्लिकवर

Today's (30th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: नवीन वर्षाला लवकरच सुरुवात होईल. या काळात अनेक गुंतवणुकदार सोन्याचा-चांदीला गुंतवणूकीचा चांगला पर्याय म्हणून पाहातात. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर पाहायला मिळाला आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (30th December 2023):

वर्ष संपण्यासाठी अवघा दोन दिवस बाकी आहे. नवीन वर्षाला लवकरच सुरुवात होईल. या काळात अनेक गुंतवणुकदार सोन्याचा-चांदीला गुंतवणूकीचा चांगला पर्याय म्हणून पाहातात.

अनेकांना सोनं-चांदी खरेदी करण्याची इच्छा असते. अशातच येत्या वर्षभरात सोन्याच्या भावात अनेक बदल पाहायला मिळाले. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर पाहायला मिळाला आहे. सप्टेंबर २०२३ पासून ते डिसेंबरपर्यंत सोन्याच्या भावात अधिक बदल झाले आहे.

सणासुदीच्या काळात धातूला अधिक मागणी असते. अशातच ४ डिसेंबरला सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती. वर्षभरात चौथ्यांदा सोन्याच्या भावाने उच्चांकाचा टप्पा ओलांडला होता. जाणून घेऊया वर्षभरात सोन्याचे भाव किती रुपयांनी वाढले.

जानेवारी महिन्यात २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी सोन्याचे (Gold) भाव ५४,६३० रुपये होते तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या वाढीत पुन्हा वेग पाहायला मिळाला.

दिवाळीत सोन्याचे भाव नरमले होते तर डिसेंबरमध्ये सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा उच्चांकाची पातळी गाठली. गुरुवारी २८ डिसेंबरला प्रतितोळानुसार सोन्याचा भाव हा ६४,३०० रुपयांवर येऊन पोहोचला होता. अशातच आज सोन्याचे भाव स्थिर आहेत. नवीन वर्षात सोन्याचा भाव ७० हजारांचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता व्यापारांकडून वर्तवण्यात आली आहे. अशातच जानेवारीपासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत १० हजार रुपयांनी वाढले आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८७० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,९७० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)वाढ झालेली आज पाहायला मिळाली. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,६०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,८७० रुपये

  • पुणे - ६३,८७० रुपये

  • नागपूर - ६३,८७० रुपये

  • नाशिक - ६३,९०० रुपये

  • ठाणे - ६३,८७० रुपये

  • अमरावती - ६३,८७० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

Jupiter Retrograde 2025: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींची होणार बल्ले-बल्ले; गुरु वक्री होऊन देणार पैसा

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

SCROLL FOR NEXT