Gold Silver Price  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate Today: सोन्याला पुन्हा सोन्याचे दिवस आले; प्रतितोळा भाव किती? खरेदीला जाण्याआधी नवे दर पाहा!

Gold Silver rate 16th May 2024: सध्याचे लगीनसराईचे दिवस सुरु आहेत. या दिवसात ग्राहक जास्त प्रमाणात सोने चांदी खरेदी करतात. सोने चांदीच्या भावात आज वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या लगीनसराईचे दिवस सुरु आहेत. लग्नकार्यात सर्वाधिक खरेदी केली जाते. कपड्यांपासून ते अगदी दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे ग्राहकांचा सोने-चांदी खरेदी करण्याकडे जास्त कल दिसत आहे. सोने चांदीचे दर मागील काही दिवस कमी झाले होते. त्यानंतर आता हे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. सोन्याच्या किंमतीत तब्बल ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. देशात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ७४,०२० रुपये आहे. जाणून घेऊया सोने-चांदीचे नवे दर

सोन्याचे भाव (Gold Rate Today)

आज सोन्याच्या दरात जवळपास ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत १८ कॅरेट सोने ५५,५१० रुपये प्रतितोळा विकले जात आहे. २२ कॅरेट सोने ६७,५८० रुपयांनी प्रतितोळा विकले जात आहे. २४ कॅरेट सोने प्रतितोळा ७४,०२० रुपयांनी विकले जात आहेत.

चांदीचे भाव (Silver Rate Today)

१ किलो चांदीच्या किंमतीत जवळपास १,५०० रुपयांनी वाढ जाली आहे. देशात १ किलो चांदी जवळपास प्रतितोळा ८९,१०० रुपयांनी विकली जात आहे. काल चांदीची किंमत ८७,६०० रुपये होती. या किंमतीत आज वाढ झाली आहे.

देशात सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीला चर सोने चांदीच्या भावाने उच्चांक गाठला होता. मे महिन्याच्या सुरुवातील सोन्याचे भाव ७३ हजार रुपये झाले होते. त्यानंतर आता हे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

JDCC Bank : जिल्हा बँकेच्या 'दगडी इमारत' विक्रीवरून राजकारण तापले; महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Karva Chauth 2025: स्त्रिया करवा चौथ व्रत करताना चंद्राची पूजा का करतात? जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: NCP अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? या केंद्रीय मंत्र्याचं सूचक विधान|VIDEO

SCROLL FOR NEXT