Gold Silver Fresh Fall Prices  Saam TV
बिझनेस

Gold Silver Fresh Fall Prices : ग्राहकांना मोठा दिलासा; सोनं घसरलं चांदीचा भावही नरमला; वाचा आजचे ताजे दर

Gold Silver Prices Fall (27 May 2024) : आजही सोन्याच्या किमतींमध्ये बदल झाला आहे. सामान्य नागरिकांना आजचा सोन्याचा भाव वाचून दिलासा मिळणार आहे. कारण आज सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या आहेत.

Ruchika Jadhav

सोने चांदीचे आजचे दर जाहीर झाले आहेत. आजही सोन्याच्या किमतींमध्ये बदल झाला आहे. सामान्य नागरिकांना आजचा सोन्याचा भाव वाचून दिलासा मिळणार आहे. कारण आज सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या आहेत. गावांसह शहरांमध्ये यामुळे सोन्याच्या दुकानात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याचे दर 18, 22 आणि 24 कॅरेटमध्ये 100 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज 18 कॅरेट 100 ग्राम सोन्याची किंमत 5,44,400 रुपये इतकी आहे. तर प्रती तोळा 18 कॅरेट सोन्याची किंमत 54,440 रुपये इतकी आहे.

22 कॅरेट 100 ग्राम सोनं 100 रुपयांनी कमी झालं असून 6,65,400 रुपयांवर पोहचलं आहे. तर 22 कॅरेट प्रती तोळा सोनं 66,540 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत 100 ग्रामसाठी 7,25,800 रुपये इतकी आहे. तर प्रती तोळा सोनं 72,580 रुपयांना विकलं जात आहे.

मुंबईमधील 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत

मुंबईमध्ये एक ग्राम 22 कॅरेट सोनं 6,639 रुपये आहे. तर एक ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,243 रुपये इतकी आहे.

पुण्यामधील 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत

पुण्यात आणि मुंबईत सोन्याचे दर नेहमी सारखेच असतात. त्यामुळे एक ग्राम 22 कॅरेट सोनं 6,639 रुपये आहे. तर एक ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,243 रुपये इतकी आहे.

चांदीचा भाव

आज चांदीच्या किंमती देखील घसरल्या आहेत. चांदी प्रति किलो 100 रुपयांनी कमी झाली असून चांदीचे दर 91,400 रुपये झालेत. मुंबई आणि पुण्यात चांदीची किंमत 91,400 रुपये प्रति किलो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

SCROLL FOR NEXT