Today's Gold Silver Rate Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: सोन्याचा भाव जैसे थे, चांदीच्या दरात घसरण सुरुच; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा दर

(27th February 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: सलग दुसऱ्यांदा सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (27th February 2024):

सलग दुसऱ्यांदा सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. शनिवारी सकाळाच्या सत्रात सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली होती. परंतु. मागच्या दोन दिवसांपासून भाव घसरले आहेत.

परंतु,आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल होताना दिसून आला. कॉमेक्सवर सोने प्रति औंस $ 2,041.20 वर उघडले तर चांदी हे प्रति औंस $22.52 वर उघडले. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७७५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,९४० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १६० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीतही (Price) वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७४,००० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार ५०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,८४० रुपये

  • पुणे - ६२,८४० रुपये

  • नागपूर - ६२,८४० रुपये

  • नाशिक - ६२,८७० रुपये

  • ठाणे - ६२,८४० रुपये

  • अमरावती - ६२,८४० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Wedding : मालिकेच्या सेटवर सुरू झाली लव्ह स्टोरी, ४ वर्ष केलं डेट; प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्न बंधनात, पाहा VIDEO

Sambhajinagar: नवरा- बायकोचा ट्रॅफिक पोलिसावर हल्ला, भररस्त्यात शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

PM Mudra Yojana: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT