JALGAON GOLD SILVER PRICE HIKE; GOLD UP RS 4,500, SILVER UP RS 11,000 saam tv
बिझनेस

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना बसला मोठा धक्का! एकाच झटक्यात भाव गगनाला भिडले, काय आहेत नवे दर?

Big Spike In Gold And Silver Rates In Jalgaon: जळगावमध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा दर साडेचार हजारांनी तर चांदीचा दर 11 हजार रुपयांनी वाढला. जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान आज पुन्हा मौल्यवान धातूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल साडेचार हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 11 हजार रुपयांची वाढ झाली आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सराफ बाजारात गर्दी कमी होताना पाहायला मिळत असून दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट मात्र कोलमडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. आठवडाभर दरवाढीचे सत्र सुरू राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र आज पुन्हा दरांनी मोठी उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी डॉलरचे मूल्य, गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम सोन्या चांदीच्या दरावर होत असल्याचे सराफ व्यवसायिकांचे म्हणणे आहे.

आज सोन्याच्या दरात साडेचार हजार रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर 1 लाख 57 हजार 700 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात तब्बल 11 हजार रुपयांची वाढ खाली आहे. चांदीचा दर 2 लाख 30 हजार रुपयांवर वाढून 2 लाख 48 हजार रुपये प्रति किलो झाला आहे. हे दर विनाजीएसटी आहेत. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे आगामी काळात सोने-चांदीच्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर आणखी ताण पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT