Gold Silver Price Today (3rd November 202) Saam tv
बिझनेस

Gold Silver Price Today (3rd November): सोन्याचे दर गगनाला, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Today's (3rd November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : मागच्या महिन्याभरात सोनं ४००० रुपयांनी वाढले आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (3rd November 2023):

अवघ्या काही दिवसात दिवाळीचा सण सुरु होईल. सणासुदीच्या काळात अनेकजण सोन्याच्या दागिन्यात गुंतवणूक करतात. परंतु, सध्या सोन्याच्या भावात वाढ होताना दिसून येत आहे.

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर अखाती देशातील युद्धामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहे. मागच्या महिन्याभरात सोनं ४००० रुपयांनी वाढले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सणासुदीच्या काळात सोन्याच्या दराला विशेष मागणी असते परंतु, भावात वाढ झाल्यामुळे सराफ बाजारात आणि ज्वेलर्सच्या दुकानात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी सोनं आणखी महागणार का असा प्रश्न देखील सर्वसामान्यांना पडला आहे. कालच्या दरापेक्षा सोन्याच्या भावात ११० रुपयांनी वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६७५ रुपये मोजावे लागणार आहेत तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,९०० रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीच्या (Silver) किमतीच किंचित घट झालेली पाहायला मिळाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७४,१०० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.

मुंबई (Mumbai) -पुण्यात सोन्याचा भाव हा काही प्रमाणात सारखा असतो. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार या शहरात आज २४ कॅरेटसाठी ६१,७५० रुपये मोजावे लागणार आहे तर नागपूर-ठाण्यातही भाव सारखाच आहे. अशातच नाशिकमध्ये अधिकचे पैसे मोजावे लागतील. आज नाशकात २४ कॅरेटसाठी ६१,७८० रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT