Gold Silver Price Today (4th November) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (4th November): आज सोनं स्वस्त की, महाग? १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? जाणून घ्या

Today's (4th November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात सोनं १२०० रुपयांनी स्वस्त झाले होते.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (4th November 2023):

लवकरच दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. या काळात सोन खरेदीला विशेष महत्त्व असते. अनेकजण सोन्याच्या दागिन्यात गुंतवणूक करतात. या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव घसरला होता.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात सोनं १२०० रुपयांनी स्वस्त झाले होते. २८ ऑक्टोबरला प्रति तोळ्यासाठी सोन्याचा (Gold) भाव हा ६२,७७० रुपये इतका होता. दसऱ्यापूर्वीच सोन्याच्या भावाने ६२ हजारांचा टप्पा गाठला होता. अशातच दिवाळीला देखील सोन्याचा भाव आणखी वाढणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आखाती देशातील युद्धाची झळ भारतासह इतर अनेक देशांना सोसावी लागत आहे. परंतु आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. २४ कॅरेटनुसार सोन्याच्या दरात ११० रुपयांनी घसरण झालेली पाहायाला मिळाली.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६६५ रुपये मोजावे लागणार आहेत तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,७९० रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीच्या (Silver) किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७५००० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.

मुंबई (Mumbai) -पुण्यात सोन्याचा भाव हा काही प्रमाणात सारखा असतो. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार या शहरात आज २४ कॅरेटसाठी ६१,६४० रुपये मोजावे लागणार आहे तर नागपूर-ठाण्यातही भाव सारखाच आहे. अशातच नाशिकमध्ये सोन्याचे भाव किंचित घसरले आहे. आज नाशकात २४ कॅरेटसाठी ६१,६७० रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Maharashtra Live News Update: कल्याण पश्चिममधील अनुपम नगर परिसरातील घरावर झाड पडल्याने ३ घरांचे नुकसान

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT