Gold Silver Price Today  google
बिझनेस

Gold Silver Price Today : खुशखबर! सलग तीन दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Gold Price Drop : सोनं-चांदीच्या किमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. पुढील माहितीत आपण आजचे १८, २२ अन् २४ कॅरेटचे दर जाणून घेणार आहोत.

Sakshi Sunil Jadhav

सर्वसामान्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. सराफा बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सोनं चांदीच्या किंमतीत घसरण होते. गेल्या काही दिवसांत या किंमतींमध्ये चढ उतार पाहायला मिळत होता. पण शनिवार पासून या किमती कमी होताना दिसल्या. सलग तीन दिवस हे दर घसरले आहेत. फक्त सोनंच नाही तर चांदीच्या किंमतींमध्ये सुद्धा बदल झाल्याचं पाहायला मिळतंय.

अमेरिका आणि इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्याही किंमतींमध्ये वाढ झाली होती. तसेच सोन्याच्या किंमतीत वाढ होणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण या किमती गेल्या तीन दिवसांपासून कमी होताना दिसतायेत. GoodReturns नुसार, आज २४ कॅरेट १ तोळा (24k 1 Tola Gold Today Price) सोन्याच्या किमतीत ३००० रुपयांनी घट झाली आहे. पुढील बातमीत आपण आज किती रुपयांनी सोनं- चांदी स्वस्त झालंय हे जाणून घेणार आहोत.

सराफा बाजारात आजच्या २४ कॅरेट सोन्याची प्रति १ ग्रॅम सोन्याच्या किमतीत ३०० रुपयांनी घट झाली असून सोन्याची किंमत ही १५,२७३ रुपये आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ही १४,००० रुपये आहे. यात २७५ रुपयांनी घट झाली आहे. तर १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्यात २२५ रुपयांची घट झाली असून त्याची किंमत ही ११,४५५ रुपये आहे.

मुंबईतील २४ कॅरेट सोन्याची आजची किंमत (Today Gold Price 24K Per Gram in Mumbai)

मुंबईतील २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १५,२७३ रुपये आहे.

८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १,२२,१८४ रुपये आहे.

१० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १,५२,७३० रुपये आहे.

१०० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १५,२७,३०० रुपये आहे.

मुंबईतील २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १४,००० रुपये आहे. (Today Gold Price 22K Per Gram in Mumbai)

८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १,१२,००० रुपये आहे.

१० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १,४०,००० रुपये आहे.

१०० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १४,००,००० रुपये आहे.

मुंबईतील १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा ११,४५५ रुपये आहे. (Today Gold Price 18K Per Gram in Mumbai)

८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा ९१,६४० रुपये आहे.

१० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १,१४,५५० रुपये आहे.

१०० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा ११,४५,५०० रुपये आहे.

पुण्यातील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in Pune)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,२७३

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,०००

१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,४५५

नाशिकमधील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in Nashik)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,२७६

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,००३

१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,४५८

दिल्लीमधील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in Delhi)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,५९१

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,०१५

१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६९९

चेन्नईमधील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in Chennai)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,४९१

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२००

१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,९१०

ठाण्यातील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in Thane)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,५९१

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,०१५

१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६९९

आजचा चांदीचा भाव

चांदीच्याही दरात घसरण पाहायला मिळतेय. चांदी प्रति ग्रॅम ही २६५ रुपये आहे. ८ ग्रॅम चांदी २,१२० रुपये झाली आहे. तर १० ग्रॅमचा आजचा भाव हा २,६५० रुपयांवर पोहोचला आहे. यात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या किंमतीही कमी होताना दिसतायेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेंच्या उपस्थितीत जंतरमंतरवर कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू

Deool Band 2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 'देऊळ बंद २' टीमला शाबासकी; जगभरात केली ६० कोटींपेक्षा जास्तची कमाई

Moringa Chutney: वजन कमी करण्यासाठी मोरिंग्याच्या पानाची चटणी कशी बनवाल?

Mumbai : मुंबई हादरली! बेपत्ता कुख्यात गुंडाची हत्या, गटारात आढळला मृतदेह

अभिजीत दिपकेला विमानतळावर का रोखलं? CJPच्या संस्थापकाभोवती अधिकाऱ्यांचा गराडा

SCROLL FOR NEXT