Gold Silver Rate (7th December 2023) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (7th December 2023): सोन्याच्या दरात वाढ, मुंबई-पुण्यात आजचा भाव किती? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (7th December 2023):

लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोन्याच्या दरात पतझड पाहायला मिळाली. सोमवारी सोन्याने उच्चांकाची पातळी ओलांडली होती. अशातच आज सोन्याचा दरात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. डिसेंबर महिन्यात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी ६४ हजारांचा आकडा पार केला होता अशातच आज पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज सोन्याच्या दरात ११० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात ग्राहकांना अधिक प्रमाणात पैसे मोजावे लागणार आहे. २४ कॅरेटनुसार सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

मागील सहा महिन्यात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली आहे. येत्या वर्षात सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्त्राइल-हमास युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर दिसून येत आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७७० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,९३० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,२०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६२,७८० रुपये

  • पुणे - ६२,७८० रुपये

  • नागपूर - ६२,७८० रुपये

  • नाशिक - ६२,८१० रुपये

  • ठाणे - ६२,७८० रुपये

  • अमरावती - ६२,७८० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha : सांगलीत काँग्रेससमोर उमेदवारीचा पेच; जयश्री पाटील उमेदवारीवर ठाम!

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

SCROLL FOR NEXT