Gold Silver Rate (4th December 2023) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (4th December 2023): सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ; दागिने खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागतील?

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (4th December 2023):

डिसेंबर महिना सुरु झाला आणि लग्नसराईच्या हंगामाला सुरुवात झाली. या काळात महिलांचे आकर्षण हे धातूंच्या वस्तूंवर अधिक असते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर घसरले होते. परंतु, लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दागिन्यांना विशेष मागणी असते.

सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाली. दिवाळीच्या काळात सोन्याचे दर नरमले होते. लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावाला मागणी असल्यामुळे दोन्ही धातूंमध्ये तेजी सत्र सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या वर्षी सोन्याने विक्रमी दराकडे तीन ते चार वेळी आगेकूच केली होती. मागच्या सहा महिन्यात सोन्याच्या दरात पतझड पाहायला मिळाली. जागतिक स्तरावरही सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे आज सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. आज सोन्याच्या भावात ४४० रुपयांनी वाढ झाली.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,९०० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६४,३५० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)स्थिर आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८०,५०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६४,२०० रुपये

  • पुणे - ६४,२०० रुपये

  • नागपूर - ६४,२०० रुपये

  • नाशिक - ६४,२३० रुपये

  • ठाणे - ६४,२०० रुपये

  • अमरावती - ६४,२०० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT