Gold Silver Price Today (26th October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (26th October): अब की बार सोनं ६२ हजार पार; सोन्याच्या दरात मोठी उसळी, चेक करा तुमच्या शहरातील नवे दर

Today's (26th October 2023) Gold Silver Rate In Maharashtra : आज सोन्याच्या भावाने ६२ हजारांचा आकडा पार केला आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (26th October):

दिवाळीपूर्वीच सोन्याच्या दरात मोठी उसळण पाहायला मिळाली आहे. खरेदीच्या काळात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून आली.

दसऱ्यापूर्वीच सोन्याचे दर गगनाला भिडले होते. मागच्या चार महिन्यात सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळी गाठली. या वर्षी फेब्रुवारी- एप्रिल महिन्यात धातुंनी रेकॉर्ड ब्रेक केले होते. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली. परंतु, इस्त्राइल हमास युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर दिसून आला. साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंतरराष्ट्रीय बाजारात आखाती देशातील युद्धांमुळे सोन्या-चांदीच्या भावात वाढ होताना दिसून आली. त्यामुळे यंदाच्या दिवाळी भाव आणखी वाढणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मागच्या १० दिवसांत सोन्याच्या भावात तब्बल ३००० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. आज सोन्याच्या भावाने ६२ हजारांचा आकडा पार केला आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६९५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,११० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच आज सोन्याच्या भावात १६० रुपयांनी (Price) वाढ झाली आहे. चांदीचा भावात आज वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच १० ग्रॅम चांदीसाठी (Silver) ७५१ रुपये मोजावे लागणार आहे.

1. मुंबई-पुण्यात आज सोन्याचा भाव किती?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरात मुंबई (Mumbai)-पुण्यात आज २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव हा ६१,९६० रुपये आहे. आज सोन्यासाठी १६० रुपये मोजावे लागतील. तर नाशिकमध्ये ६१,९९० रुपये मोजावे लागणारे आहे. आज नाशिकमध्ये हे सोन्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT