Gold Silver Price Today (3rd October)  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (3rd October) : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं उच्चांकी पातळीच्या तुलनेत ४००० रुपयांनी स्वस्त

Today's 3rd October Gold Silver Rate In Maharashtra : डॉलरच्या वाढीमुळे आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (3rd October):

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. डॉलरच्या वाढत्या किंमतीमुळे चांदीचा भाव हा सात महिन्यांनी निचांकी पातळीवर आला आहे.

सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या भावात सुमारे २९०० रुपयांनी घसरण झाली असून सोन्याची किंमत सुमारे ९०० रुपयांनी घसरली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीतही नरमाई आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी हेड अनुज गुप्ता यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले की, डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या (Gold) किमती घसरत आहेत. यामुळे बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून येत आहे. यावर्षी चांदीच्या भावात सुमारे 12 हजार रुपयांनी (Price) घसरण झाली आहे. सोन्या-चांदीचे भाव पुढील काही दिवस चढ-उतारांसह राहतील. तर सणासुदीच्या (Festival) काळात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

1. फ्युचर्सच्यानुसार सोन्याच्या किमती

आजही सोन्याचे भाव घसरणीसह उघडले. MCX वर सोन्याचे आजचे दर १७५ रुपयांच्या घसरणीसह ५७,४२५ रुपयांवर उघडला. तर काल ९०२ रुपयांच्या घसरणीसह ५६,६९८ रुपयांवर व्यवहार करत होता. त्यात उच्चांक ५७,४२५ आणि नीचांकी ५६,५६५ रुपयांवर आज पोहोचला आहे. मे महिन्यात सोन्याच्या किमतीने ६१,८४५ रुपये प्रति १० ग्रॅमसाठी सर्वोच्च पातळी गाठली होती

2. चांदीही नरमली

आज चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. याच्या किमती ७ महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सेचेंज (MCX)वर चांदीचा भाव हा ६९,२५५ प्रति किलो आहे.

3. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. कॉमेक्सवर सोने १८४४.९० डॉलर प्रति तोळ्यावर उघडले होते. तर काल $1947.20 वर बंद झाले. $10.70 च्या घसरणीसह $ 1836.50 प्रति तोळ्यावर व्यापर करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: मालाडमधील छटपूजेच्या आयोजनावरून मनसेचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

SCROLL FOR NEXT