एप्रिल महिन्याच्या सलग तीन आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईच्या काळात धातूंच्या किमती वाढल्याने खरेदीदारांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झालेली पाहायला मिळाली. सोन्याचा भाव हा २४०० डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक उसळला आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत सुद्धा सोने-चांदीच्या दरात आणखी उसळी येण्याची शक्यता आहे.
शनिवारी २२ एप्रिलला जळगावमध्ये जीएसटीसह सोन्याच्या भावाने ७६ हजारांचा टप्पा ओलांडला होता. युद्धामुळे धातुंच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज स्थानिक बाजारात सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे तर चांदीच्या वाढत्या दराला ब्रेक मिळाला आहे.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,७७० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७३,८४० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold)भावात ५५० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८५,५०० रुपये मोजावे लागतील. तर आज चांदीच्या भावात हजार रुपयांनी घसरण झाली आहे.
२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)
मुंबई (Gold Rate in Mumbai) - ७३,६९० रुपये
पुणे (Gold Price in Pune) - ७३,६९० रुपये
नागपूर (Gold Rate in Nagpur) - ७३,६९० रुपये
नाशिक(Gold Price in Nashik) - ७३,७२० रुपये
ठाणे (Gold Rate in Thane) - ७३,६९० रुपये
अमरावती (Gold Price in Amravati) - ७३,६९० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.