Gold Rate  Saam Tv
बिझनेस

Gold Rate: आठवड्याभरात सोन्याचे दर ३,७४९ रुपयांनी वाढले; 22K, 24K कॅरेटचे भाव किती?

Gold Silver Rate Weekly Update: मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसली. ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर ३७०० रुपयांनी वाढले आहेत.

Siddhi Hande

ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात बदल

मागच्या आठवड्यात सोन्याचे दर वधारले

आठड्याभरात १ तोळ्यामागे ३,७०० रुपयांची वाढ

सध्या लग्नसराई सुरु आहे. लग्नसराईच्या दिवसात सोने खरेदी केले जाईल. स्त्रियांसाठी वेगवेगळे दागिने तयार केले जातात. त्यामुळे सध्या सोन्याच्या दागिन्यांना खूप मागणी वाढत आहे. सोन्याच्या मागणीसोबतच किंमतीदेखील वाढत आहेत. दरम्यान, मध्यंतरी सोन्याचे भाव घसरलेदेखील होते. मागच्या आठवड्यात सोन्याच्या चांदीच्या दरात चढ उतार होत होती. सोन्याने शेवटच्या दिवशी उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या मागच्या आठवड्यातील सोन्याचे दर

MCX नुसार सोन्याचे दर

मल्टी कमोडिटी एक्सटचेंज या साइटवर सोन्याचे दर आठवड्याभरात सतत बदलताना दिसले. सोन्याचे दर सुरुवातीला १,२५,२८० रुपये प्रति तोळा होते. यानंतर २८ नोव्हेंबरला हे दर १,२९,५९९ झाले. दरम्यान, मागच्या आठवड्यात पाच दिवसात सोन्याचे दर ३,७४९ रुपयांनी वाढले होते.

देशांतर्गत बाजारपेठेतदेखील सोन्याचे दर वाढले

देशांतर्गत बाजारातदेखील सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. इंडियन बुलियन ज्लेवर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, २१ नोव्हेंबरला सोन्याचे द १,२३,१४६रुपये प्रति तोळा होते. त्यानंतर शुक्रवारी हे दर १,२६,५९१ रुपये झाले.

सोन्याचे दर किती होते? (Gold Rate Last Week)

२४ कॅरेट सोन्याचे दर -१,२६,५९१ रुपये/प्रति तोळा

२२ कॅरेट सोन्याचे दर-१,२३,५५० रुपये/प्रति तोळा

२० कॅरेट सोन्याचे दर-१,१२,६७० रुपये/प्रति तोळा

१८ कॅरेट सोन्याचे दर-१,०२,५४० रुपये/प्रति तोळा

१४ कॅरेट सोन्याचे दर- ८१,६५० रुपये/प्रति तोळा

चांदीच्या दरातही वाढ

चांदीच्या दरातदेखील वाढ होताना दिसत आहे. चांदीच्या दरानेदेखील उच्चांक गाठला आहे. मागच्या आठवड्यात २१ नोव्हेंबरला १ किलो चांदीचे दर १,५७,८७७ रुपये होते. त्यानंतर पाच दिवसात हे दर १७,६०७ रुपयांनी वाढले. हे दर मागच्या आठवड्यात १,६४,३५९ रुपये झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT