Gold Rate  x
बिझनेस

घरगुती गॅस सिलिंडर ६० रूपयांनी महागला, सोन्याची किंमत आज वाढली की कमी झाली? वाचा २२k, २४k चे लेटेस्ट दर

LPG Cylinder Price Hiked : इराण-इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात मोठी उलथापालथ झाली असून भारतात घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला आहे. त्याचबरोबर २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली असून आजचे ताजे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gold Rate Today : इराण-इस्त्राइल युद्धाची धग भारतामध्येही बसत असल्याचे चित्र आहे. ८ दिवसांपूर्वी इराण-इस्त्राल युद्धाला सुरूवात झाली होती, आज सकाळी अचानक घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली. या युद्धाचा परिणाम जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात सर्वात मोठी वाढ झाली आहे. शेअर मार्केटपासून ते सिलिंडर आणि तेलांच्या किंमतीवर युद्धाचा परिणाम झाला. आता सोन्याच्या दराचा स्फोट झाल्याचे चित्र आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा २५२० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली. मागील काही दिवसांतील ही सर्वात मोठी वाढ होती.

गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमती सातत्याने घसरत होत्या. पण आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इराण-इस्त्राईल, अमेरिका युद्धामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे.

सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याची किंमत २५२० रूपयांनी वाढून प्रति तोळा १६३,८०० रुपये इतकी झाली आहे. शुक्रवारी प्रति १० ग्रॅम १६१,२८० रुपये होती. तर २२ कॅरेट सोन्याच्या किमती प्रति १० ग्रॅम ₹१५०,१५० आहे. २३०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.

१८ कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा १,२२,८८० रुपये इतकी झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत १८८० रूपयांची वाढ झालेली आहे.

कोणत्या शहरात सोन्याचा भाव काय ?

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १६३,६४० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १५०,००० रुपये आहे.

तर जयपूरमध्ये २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १६३,८०० रुपयांना मिळे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १५०,१५० रुपये आहे.

लखनौमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १६३,८०० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १५०,१५० रुपये आहे.

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १६३,८०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १५०,१५० रुपये आहे.

किमती का वाढल्या ?

सोन्या-चांदीच्या किमतीत अलिकडच्या काळात झालेली वाढ आंतरराष्ट्रीय तणावामुळे देखील होत आहे. मागील आठ दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती आहे. इराणकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेशी संलग्न असलेल्या लष्करी तळांसह अनेक मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. अशा वातावरणात गुंतवणूकदारांच्या चिंता वाढतात, ज्यामुळे ते सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT