Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सोनं झालं आणखी स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

Gold Price Today 28th October 2025: दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८२० रुपयांनी घसरले आहेत. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Siddhi Hande

सोन्याचे सध्या सध्या घसरताना दिसत आहे. सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून वाढत होते. दिवाळीत मात्र दरवाढीला ब्रेक मिळाला होता. त्यानंतर पुन्हा थोड्याफार प्रमाणात दर वाढले. आज सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. सोन्याच्या दरात जवळपास ८२० रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळत आहे.

ऐन दिवाळीत सोन्याचे दर घसरले होते. यामुळे अनेकांनी सोने खरेदी केली. सोन्याचे दर घसरले असले तरीही ते १,२२,४६० रुपये आहेत.हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये. दरम्यान, तरीही सणासुदीच्या दिवशी अनेकांनी सोने खरेदी केले. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Price)

आज १ तोळा सोन्याचे दर ८२० रुपयांनी कमी झाले आहे. हे दर सध्या १,२२,४६० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६५६ रुपयांनी कमी झाले असून ते ९७,९६८ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ८२०० रुपयांनी घसरले असून सध्या १२,२४,६०० रुपये होते.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर ७५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१२,२५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८९,८०० रुपये झाले आहेत. हे दर ६०० रुपयांनी घसरले आहेत.१० तोळा सोन्याचे दर ११,२२,५०० रुपये आहेत. या दरात ७,५०० रुपयांची घसरण झाली आहे.

१८ कॅरेटचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ६२० रुपयांनी घसरले असून १ तोळ्याची किंमत ९१,८४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ४९६ रुपयांनी घसरले असून हे दर ७३,४७२ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ६२०० रुपयांनी घसरले असून ते सध्या ९,१८,४०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT