Gold Rate Today saam tv
बिझनेस

Today Gold Rate: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले; वाचा १ तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Today Gold Price 29th August 2025: सलग तीन दिवसांपासून सोन्याचे दर वाढ आहेत. आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव.

Siddhi Hande

आज सोन्याच्या दरात किंचित वाढ

१० तोळ्यामागे १०० रुपयांची वाढ

तुमच्या शहरातील सोन्याचे दर वाचा

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होत होती. सोन्याच्या दरात मागच्या काही दिवसांत १० तोळ्यामागे ३००० ते ८००० रुपयांची वाढ झाली होती.दरम्यान, आज सोन्याच्या दरात किचिंत वाढ झाली आहे. प्रति तोळ्यामागे फक्त १० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

आज सोन्याच्या दरात एकदम किचिंत वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. आज सोन्याचे दर १ तोळ्यामागे फक्त १० रुपयांनी वाढले आहेत.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर १,०२,६१० रुपये आहे. या दरात कालच्या तुलनेत आज फक्त १० रुपयांची वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याचे दर १०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १०,२६,१०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दरदेखील १० रुपयांनी वाढले आहेत.हे दर ९४,०६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७५,२४८ रुपये आहेत. या दरात फक्त ८ रुपयांची वाढ झाली आहे. १० तोळ्यामागे १०० रुपयांची वाढ झाली असून हे भाव ९,४०,६०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील १० रुपयांची वाढ झाली आहे. १ तोळ्यामागे ग्राहकांना ७६,९६० रुपये मोजावे लागणार आहेत. १० तोळ्यामागे ७,६९,००० रुपये मोजावे लागणार आहे. ८ ग्रॅमसाठी तुम्हाला ६१,५६८ रुपये मोजावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइट तिकीटावर ६००० रुपयांचा डिस्काउंट; कोणाला मिळणार फायदा?

Maharashtra Live News Update : विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना- पीएम मोदी

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

GK: भारतातील पहिली मेट्रो सेवा कशी आणि कुठे सुरु झाली? जाणून घ्या

Maharashtra Politics : कोल्हापुरात शिंदे गटाला मोठा झटका! बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT