Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं ६०० रुपयांनी घसरले, १० तोळ्याचे दर किती?

Gold Rate Today Fall: आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर मात्र स्थिर आहे. सोन्याचे दर १ लाखांच्या वर गेले आहेत. त्यामुळे खरेदीदारांना सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या भावात गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने खरेदीदारांना मात्र फटका बसत आहे. दरम्यान, आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर थोड्याफार प्रमाणात घसरले आहेत. सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

सोन्याचे दर जास्त रुपयांनी घसरले नाही आहेत. १०ग्रॅम सोन्याचे दर ६० रुपयांनी घसरले आहेत.त्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

सोन्याचे दर (Gold Rate)

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर १,००,६९० रुपये प्रति तोळा आहे. या दरात ६० रुपयांनी घट झाली आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०,५५२ रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याचे दर १०,०६९ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर

आज २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ९२,३०० रुपयांवर विकलं जात आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७३,८४० रुपये आहे. तर १०० ग्रॅम सोन्याचे दर ९,२३,००० रुपये आहे. या दरात ५०० रुपयांनी घट झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Carat Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ७५,५२० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,४१६ रुपये आहे. १० तोळा सोन्याचे दर ७,५५,२०० रुपये आहे.

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज ८ ग्रॅम चांदीचे दर ८८० रुपये आहे. १ तोळा चांदी १,१०० रुपयांना विकली जात आहे. तर १०० ग्रॅम चांदीचे दर ११,००० रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT