Gold Silver Today Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 10 टक्क्यांनी भाव कोसळले; आणखी स्वस्त होणार का?

Gold Price Fall : सोन्याच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले.

Sakshi Sunil Jadhav

ऐन लग्नसराईत सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव जवळपास ९.५ टक्क्यांनी घसरला असून, १४ महिन्यातल्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यामुळे ग्राहकांना आता सोनं आणखी स्वस्त मिळणार का, असा प्रश्न पडला आहे. सोन्याचा भाव हा १२५४० रुपयांनी आठवड्याभरात घसरला आहे.

मुंबई-पुण्यासह इतर शहरातले दर

२२ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर १,२५,०८० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,१४,६५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

मुंबईतील सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १२५,०८०

२२ कॅरेट - १,१४,६५०

पुण्यातील सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १,२५,०८०

२२ कॅरेट - १,१४,६५०

दिल्लीतील सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १,२५,२३०

२२ कॅरेट - १,१४,८००

चेन्नईतील सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १,२५,०८०

२२ कॅरेट - १,१४,६५०

सोन्याचे दर का घसरले?

सोन्याच्या किमती घसरण्यामागे पाच प्रमुख कारणं आहेत.

डॉलर मजबूत झाला - अमेरिकन डॉलरची ताकद वाढल्याने इतर देशातल्या गुंतवणूकदारांसाठी सोनं महाग झालं. त्यामुळे मागणीवर परिणाम झाला.

व्याजदर वाढण्याची शक्यता - अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये व्याजदर वाढवू शकते, असा बाजाराता अंदाज आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी इतर पर्यायांकडे वळत आहेत.

फेडचे कठोर संकेत - अमेरिकेतले महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर जास्त ठेवले जाण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव वाढला आहे.

AI कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण - शेअर बाजारातलं नुकसान भरून काढण्यासाठी काही गुंतवणूकदरांनी सोन्याची विक्री केली. त्यामुळे दर आणखी खाली आले.

महागाईची चिंता - अमेरितल्या महागाईबद्दल अनिश्चितता कायम असल्याने सोन्यातल्या गुंतवणुकीवर परिणाम झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रॅपिडोच्या विरोधात रिक्षा संघटनांचे आंदोलन; मनसेसह विविध पक्षांच्या वाहतूक सेना एकवटणार

Bathroom Vastu Tips: बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या वास्तूशास्त्र काय सांगतं? वाचा नियम

Indian Railways : मुंबई ते वाराणसीचा प्रवास होणार अवघ्या तासांत! १२ तासांचा वेळ वाचणार?

Transfer News : पोलीस दलात मोठे फेरबदल! तब्बल २७३ DSP आणि एका IPS अधिकाऱ्याची बदली, कुणाची कुठे झाली नियुक्ती

IND vs NZ 1st Test: भारताने न्यूझीलंडला विजयासाठी दिलं मोठं आव्हान, २३३ धावांची आघाडी; शेवटच्या दिवशी किवींचं काय होणार?

SCROLL FOR NEXT