Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं; वाचा १ तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate Today 1st December 2025: आज डिसेंबरच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याचे दर १ लाख ३० हजारांवर गेले आहेत. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर वाढले

महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांची वाढ

ऐन लग्नसराईत सोनं महागलं

आज डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात अनेक लग्नाचे मूहूर्त आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी होईल. अशातच महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. सोन्याचे दर आज १,३०,४८० रुपये प्रति तोळा आहेत. भविष्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. परंतु आज तर सोन्याने उच्चांक गाठला आहे.मागच्या महिन्याभरातील हे सर्वाधिक दर आहेत. देशभरात सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १ लाख ३० हजारांच्या आसपास आहेत. जाणून घ्या आजचे भाव

सोन्याचे दर (Gold Rate Today)

१ तोळ्याचे दर (1 Tola Gold Price)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांनी वाढले आहे. हे दर १,३०,४८० झाले आहेत. २२ कॅरेटचे दर तोळ्यामागे ६०० रुपयांनी वाढले असून १,१९,६०० रुपयांवर विकले जात आहेत.१८ कॅरेटचे दर ४९० रुपयांनी वाढले आहेत. हे द ९७,८६० रुपये आहेत.

८ ग्रॅम सोन्याचे दर

आज ८ ग्रॅम सोन्याचे दर ५२८ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०४,३८४ रुपये झाले आहे. २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचे दर ४८० रुपयांनी वाढले असून ९,६८० रुपयांवर विकले जात आहेत.१८ कॅरेटचे दर ८ ग्रॅममागे ३९२ रुपयांनी वाढले असून ७८,२८८ झाले आहेत.

भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढच्या ५ वर्षात सोन्याचे दर हे डबलदेखील होऊ शकतात. त्यामुळे सोने खरेदी करणे ही एक चांगली गुंतवणूक आहेत. परंतु सोने खरेदीसाठीचे सध्याचे दरदेखील सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीयेत. त्यामुळे सोनं घ्यायचं की नाही असा प्रश्न त्यांना पडलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 31 जानेवारीपर्यत निवडणूक आयोगाला निवडणूका संपवाव्या लागणार- अजित पवार

Shahajibapu Patil: शहाजीबापू पाटील राजकारण सोडण्याच्या तयारीत, म्हणाले वरिष्ठ नेत्यांशी बोलून....

लग्नात चिमुकलीवर नराधमाची घाणेरडी नजर; उसाच्या शेतात नेत अत्याचाराचा प्रयत्न, कोल्हापूर हादरलं

Local body Election : निवडणुकीला हिंसक वळण; अजितदादांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर दगडफेक, भाजपवर गंभीर आरोप

Bharti Singh Photos : दुसऱ्यांदा आई होणार कॉमेडी क्वीन, बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटोशूट

SCROLL FOR NEXT