Gold Silver Rate Today meta ai
बिझनेस

Gold Silver Price: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोनं तब्बल 2,500 रुपयांनी स्वस्त; चांदीचे दरही कोसळले, वाचा 24K आणि 22K चे दर

Gold Silver Rate Today: जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याचे दर २५०० रुपयांनी, तर चांदीचे दरही मोठ्या संख्येने घसरले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

जळगाव,

संजय महाजन जळगाव

सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू असलेल्या सोनं आणि चांदीच्या किंमतीत आज १३ नोव्हेंबर रोजी मोठी घसरण झाली. जळगावच्या सराफा बाजारात सुरू होताच सोन्याचे दर तब्बल २ हजार ५०० रुपयांनी, तर चांदीची किंमत ४ हजार रुपयांनी घसरली. त्यामुळे लग्नसराई आणि आगामी सणांसाठी दागिने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल.

जळगावमध्ये सोन्याचे आजचे दर काय?

जळगावच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३६ हजार रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २५ हजार रुपये आहे. त्यामुळे सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची असेल.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. आज जळगावमध्ये चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८१ हजार रुपयांवर आला. गुरूवारी चांदीचा दर १ लाख ८५ हजार रुपये होता. म्हणजेच एका दिवसात चांदीच्या किंमतीत ४ हजार रुपयांनी घसरण झाली.

गेल्या काही दिवसातले दर पाहिले, तर सोन्या-चांदीच्या बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याचं दिसतं. ८ नोव्हेंबरला सोन्याचा दर १ लाख ४२ हजार रुपये होता. त्यानंतर किंमतीत वाढ आणि घट होत आज तो १ लाख ३६ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं लक्ष आता बाजारातल्या पुढच्या दरांकडे लागलं आहे. पण दागिने खेरदी करताना जीएसटी, घडणावळ आणि इतर शुल्कांमुळे अंतिम किंमत बदलू शकते. त्यामुळे खरेदीआधी स्थानिक सराफाकडून ताजे दर ठरवून घ्यावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर शहराला 'संत्र्याचे शहर' किंवा 'ऑरेंज सिटी' का म्हणतात?

Maharashtra News Live Update: मुंबईतील मिठी नदीजवळ नाल्यात आढळला मृतदेह

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं नाव बदलणार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाल्या?

Makeup Removal Tips: रोज मेकअप करता? मग मेकअप काढताना या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

India vs New Zealand: मॅट हेन्री भारताला नडला! पत्त्यांप्रमाणे गडगडली टीम इंडिया, न्यूझीलंडकडून 244 रन्सने पराभव

SCROLL FOR NEXT