Gold Rate Today Saam tv
बिझनेस

लग्नसराईत सोन्यानं भाव खाल्ला, सोन्यासह चांदीही महागली, १ तोळा सोन्याचा दर किती?

Heavy Price Hike in Gold and Silver: जळगावात सोनं महागलं. केवळ ३ दिवसांत सोन्याच्या भावात तेजी. सोन्याच्या दरात १३०० रूपयांची वाढ. तर, चांदीच्या दरात ६,५०० रूपयांची वाढ.

Bhagyashree Kamble

  • सुवर्णनगरीत सोनं महागलं

  • तीन दिवसांत सोन्याच्या भावात १,३०० रूपयांची वाढ

  • तर, चांदीच्या दरात ६,५०० रूपयांची वाढ

लग्नसराईची लगबग सुरू झाली आहे. लग्न म्हटलं की शॉपिंग आणि दागिने खरेदी आलंच. सोनं -चांदीचे दागिने आपण खरेदी करतोच. मात्र, वाढत्या सोन्याच्या दागिन्यांच्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच सोन्याच्या दरात अद्याप तरी घसरण झाली नसल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात केवळ तीन दिवसांत सोन्या–चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करावे की नाही? असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे.

जळगाव म्हणजे सुवर्णनगरी. जळगावात केवळ तीन दिवसांत सोनं आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठला. सोन्याच्या दरात तब्बल १,३०० रूपये तर, चांदीच्या दरात तब्बल ६,५०० रूपयांची वाढ झाली आहे. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. अशातच ही वाढ अनेक वधूपित्यांच्या बजेटला मोठा धक्का देणारी ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी १० ग्रॅम सोन्याच्या भावात २००० रूपयांची वाढ झाली होती. १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला (विनाजीएसटी) १,२५,००० रूपये मोजावे लागत होते. दरम्यान आता नवीन दरवाढीनुसार १० ग्रॅन सोनं खरेदीसाठी आपल्याला १,२६,३०० रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,६६,००० रूपये मोजावे लागतील.

सोने प्रतिदहा ग्रॅम चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी)

११ नोव्हेंबर

सोनं एक लाख २३ हजार ९००

चांदी एक लाख ५७ हजार

१३ नोव्हेंबर

सोन एक लाख २६ हजार

चांदी एक लाख ६६ हजार

१४ नोव्हेंबर

सोन एक लाख २५ हजार २००

चांदी एक लाख ६२ हजार

१५ नोव्हेंबर

सोन एक लाख २२ हजार ९००

चांदी एक लाख ५७ हजार

१६ नोव्हेंबर

सोन एक लाख २२ हजार ९००

चांदी एक लाख ५७ हजार

१८ नोव्हेंबर

सोन एक लाख २१ हजार ५००

चांदी एक लाख ५४ हजार

२० नोव्हेंबर

सोन एक लाख २२ हजार ८००

चांदी एक लाख ५८ हजार

२४ नोव्हेंबर

सोन एक लाख २३ हजार

चांदी एक लाख ५५ हजार

२५ नोव्हेंबर

सोन एक लाख २५ हजार

चांदी एक लाख ५९ हजार ५००

२८ नोव्हेंबर

सोन एक लाख २६ हजार ३००

चांदी एक लाख ६६ हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajpal Yadav : तुरूंगाबाहेर येताच राजपाल यादवची नको ती मागणी, मुख्यमंत्र्यांना भेटून सगळे काही सांगणार

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Bhiwandi : भिवंडीत गेम पलटणार? भाजपला मोठा धक्का; 10 नगरसेवक काँग्रेससोबत जाणार?

How To Make Face Toner At Home: चेहऱ्याला लावण्यासाठी घरीच फेस टोनर कसं बनवायचं?

Dhule : सातव्या बायकोने पोटच्या मुलांसह केली आत्महत्या, नवऱ्याच्या 'त्या' कृत्याने सर्वच हादरले

SCROLL FOR NEXT