Gold Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate: सोन्याचे दर ₹८५००० पर्यंत घसरणार? आता खरेदी करावं की नाही

Gold Rate Fall 85000 Rupees: सोन्याचे दर भविष्यात घसरणार की नाही याबाबत संभ्रम आहे. सोन्याचे दर ८५००० रुपयांपर्यंत घसरणार असल्याचा एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करावे की नाही अस प्रश्न पडला आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर ८५००० रुपयांपर्यंत घसरणार?

सध्या सोनं खरेदी करावं की नाही?

वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या काळात अनेकजण सोनं खरेदी करतात. अशातच सोन्याच्या दरात अजून घसरण होणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मागच्या आठवड्यात सोन्याचे दर वाढले आहेत. त्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. इराण-इस्त्रायल युद्धामुळे सोन्याच्या किंमती घसरत होत्या. मात्र, अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचे संकेत दिले त्यामुळे सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. अशातच सोन्याचे दर ८५००० रुपयांवर येणार असल्याचा रिपोर्ट समोर आला आहे.

गोल्डमॅन सॅच्स (Goldman Sachs) कंपनीने सोन्याच्या दराबाबत रिसर्च केले आहे. रिपोर्टनुसार, सोन्याचे दर ८५,००० रुपयांपर्यंत घसरु शकतात, असं सांगण्यात येत आहे. खरंच सोन्याचे दर घसणार का याबाबत माहिती देण्यात आली आहे.

जागरण वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, सेबी रजिस्टर्ड कमोडिटी एक्सपर्ट अनुज गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान खूप महत्त्वाचे आहे. इराण आणि इस्त्रायलच्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती ११ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यानंतर बँकेच्या व्याजदरात बदल होण्याची शक्यता होती. यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी झाली परिणामी सोन्याचे दर घसरले.

सोनं खरंच ८५००० रुपयांपर्यंत घसरणार? (Gold Price Drop by 85000 Rupees)

सेबी रजिस्टर्ड कमोडिटी एक्सपर्ट अनुज गुप्ता यांनी सांगितले की, रिसर्च हाउस आपल्या कॅल्क्युलेशननुसार रिपोर्ट देते. जेव्हा बाजारात वाढ होते तेव्हा तो १०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असं सांगितलं जाते. दरम्यान, सध्या तरी सोन्याचे दर ८५,००० रुपये होण्याचे संकेत दिसत नाही. सोनं १ लाखांपेक्षा कमी होण्याचीही शक्यता कमी आहे. असं त्यांनी सांगितले.

लग्नसराईच्या काळात भारतात सोन्याचे दर किती असणार? (Gold Rate Today in India)

सोन्याचे दर सतत वाढणार नाही. सध्या सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे वेळेनुसारच सोन्याचे दर बदलतील. मागच्या दोन दिवसात सोन्याच्या दरात ५०० डॉलरने चढ-उतार पाहायला मिळाली. त्यामुळे मार्केटनुसार, हे दर बदलणार आहे,

सध्या सोनं विकणं योग्य आहे का? (Can we Sold Gold Jewellery)

तज्ज्ञांच्या मते, जर ३ ते ५ वर्षांच्या हिशोबाने बघत असाल तर सोनं सध्या सध्या विकू नका. सोन्याचे दर नेहमी वाढतच जातात. त्यामुळे तुम्हाला नफा होणार आहे.

सध्या सोनं खरेदी करावं की नाही? (Is this Right time to buy Gold)

सोने खरेदी करायचे असेल तर घाई करु नका. थोडे दिवस अजून वाट पाहणे योग्य ठरेल. सोन्याचे दर ज्या दिवशी घसरले तेव्हा तुम्ही दागिने बनवा. परंतु खूप जास्त प्रमाणात खरेदी करु नका. टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? बारामतीमधील बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या भूम तालुक्यातील गावातल्या शेकडो शेतकऱ्याचं रास्ता रोको

Viral Video : वऱ्हाड निघालं रेल्वेनं! लग्नाचा थाट असा की थेट ट्रेनचा कोच बुक केला, डान्स-गाणी अन् बरंच काही....; VIDEO व्हायरल

International Film Festival: मराठी अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलबाला, 'द मशरूमस' साठी मिळवला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार

LPG Cylinder: LPG च्या नियमात मोठा बदल, फक्त 'हे' कागदपत्र दाखवून मिळवा गॅस सिलिंडर; सर्वसामान्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT