Gold Price Prediction saam tv
बिझनेस

Gold Rate : सोनं प्रतितोळा २ लाखांपर्यंत जाणार? दसरा-दिवाळीत महागाईचा फटाका फुटणार

Gold-Silver Price: दिवाळी-दसरा आणि आगामी लग्नसराईत सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याचा भाव 1.80 लाख, तर चांदी 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

Omkar Sonawane

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सलग झालेल्या दरवाढीनंतर गुंतवणूकदारांकडून नफा वसुली करण्यात आली असून, जागतिक बाजारातील बदललेल्या परिस्थितीचाही परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर दिसून आला आहे. मात्र, बाजारातील या घसरणीनंतर भविष्यातील दरांबाबतचे चित्र अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान आगामी सणासुदीचा आणि लग्नसराईचे वातावरण सुरू होत असल्याने देशात मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या दरांना पुन्हा आधार मिळू शकतो. असा अंदाज बाजारातील तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही तज्ञांनी आगामी काही महिन्यांत सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केडिया अ‍ॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते सप्टेंबरच्या अखेरीस 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.60 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तर वर्षअखेरीस सोन्याचा दर 1.80 लाख रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो. चांदीच्या दराबाबतही त्यांनी मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले. चांदीचा भाव हा 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

सध्या सोने-चांदीचे दर का घसरत आहेत?

सोने आणि चांदीच्या दरातील अलीकडील घसरण ही बाजारातील सामान्य असल्याचे बोलले जात आहे. सलग झालेल्या दरवाढीनंतर काही गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर परिणाम निर्माण झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही भारतातील सोने-चांदीच्या दरांवर थेट परिणाम होत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

गणेशोत्सवात दाखवला छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास; थेट शाळेवर गुन्हा दाखल,नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT