Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Price: अरे बापरे! सोनं आणखी महागणार? प्रति तोळ्यासाठी १ लाख ३६ हजार मोजावे लागणार; आजचा भाव किती?

Trade War and Recession Fears Boost Gold Prices: सोनं गगनाला भिडणार? गोल्डमॅन सॅक्सच्या रिपोर्टनुसार, १० ग्रॅम सोन्याची किंमत १.३६ लाखांपर्यंत पोहोचणार.

Bhagyashree Kamble

अलीकडेच सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती की, सोन्याची किंमत प्रति तोळा ५० हजार रूपयांपर्यंत पोहोचू शकते. पण गेल्या आठवड्यात याउलट झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. इंवेस्टमेंट बँकर गोल्डमॅन सॅक्सच्या रिपोर्टनुसार, १० ग्रॅम सोन्याची किंमत १.३६ लाखांपर्यंत पोहोचू शकते.

अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या ट्रेड वॉरमुळे, २०२५च्या अखेरीस सोन्याची किंमत वाढू शकते. प्रति आउंस ४,५०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.

सोन्याच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ

गोल्डमॅन सॅक्सच्या रिपोर्टनुसार,सोन्याच्या किमतीत तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. यामुळे मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याचे भाव प्रति आउंस डॉलर ३३०० वर पोहोचले आहे. तसेच सोन्याच्या भाव हा चढताच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गोल्ड ईटीएफचा दर किती?

गेल्या आठवड्यात गोल्ड ईटीएफने पहिल्यांदाच प्रति आउंस डॉलर ३२०० चा टप्पा ओलांडलेला आहे. जागतिक स्तरावर वाढणाऱ्या ट्रेड वॉरमुळे गोल्ड ईटीएफचा दर प्रति आउंस डॉलर ३२४५.६९ च्या पातळीवर पोहोचला होता. त्यामुळे सोन्याच्या भावातही वाढ झाली आहे.

आजचा सोन्याचा दर किती?

गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार, १४ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. २४ कॅरेट गोल्ड १० ग्रॅमवर १६० रूपयांची घट झाली आहे. म्हणजेच १ तोळं सोनं आज तुम्हाला ८७,७०० रूपयात मिळेल. तर, १०० ग्रॅम सोन्याची किंमत ९,५६,६०० रूपये इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT