Gold-Silver Price Today Saam tv
बिझनेस

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळ्यामागे १२६०० रुपयांची घसरण; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold-Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. जाणून घ्या आजच्या किमती किती?

Priya More
  • जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • २४ कॅरेट १० तोळा सोनं तब्बल १२,६०० रुपयांनी स्वस्त झालं

  • २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर देखील कमी झाले

  • १ किलो चांदीच्या दरात ५००० रुपयांची वाढ

Gold Silver Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १२६० रुपयांची घसरण झाली आहे. तर २२ आणि १८ कॅरेटचं सोनं देखील स्वस्त झालं आहे. सोनं स्वस्त झालं पण चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १२६० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४०,७८० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२६०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १४,०७,८०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ११५० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,२९,०५० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ११५०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १२,९०,५०० रुपये मोजावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटचं सोनं देखील स्वस्त झालं आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ९४० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०५,५९० रुपये मोजावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ९४०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,५५,९०० रुपये खर्च कारवे लागतील.

दरम्यान, आज चांदीच्या दरात कोणताही मोठा बदल झाला आहे. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी महाग झाली आहे. १ ग्रॅमसाठी तुम्हाला २४० रुपये खर्च करावे लागतील. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये ५००० रुपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदी २,४०,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक सामाजिक न्याय भवनावर चढले मराठा तरुण

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

Maratha bandh : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! बीडसह उद्या ४ जिल्हे कडकडीत बंद; काय सुरू आणि काय बंद? पाहा संपूर्ण यादी

Thick Hair Tips : तुम्हालाही लांब, घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग हे ६ घरगुती उपाय नक्की करा

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

SCROLL FOR NEXT