Gold- Silver Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: सोन्याला पुन्हा झळाळी! १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी महागलं, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला आज कात्री लागणार आहे. सोन्यासोबत चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायाल जाण्यापूर्वी आजचे दर किती वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली

  • २४ कॅरेट १० तोळा सोनं ७,१०० रुपयांनी महागलं

  • २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ६,५०० रुपयांनी वाढ झाली

  • १ ग्रॅम चांदीतच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली

Gold Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे कारण सोन्यासोबत चांदीचे दर देखील वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ७१० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती आहेत ते वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ७१० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३०,५८० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ७,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,०५,८०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. मंगळवारी हेच सोनं १२,९८,७०० रुपये खर्च करावे लागले.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ६५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१९,७०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ६,५०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,९७,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हेच सोनं मंगळवारी ११,९०,५०० रुपयांना विकले गेले होते. त्यामुळे आज सोनं खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ५३० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९७,९४० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,७९,४०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. मंगळवारी हेच सोनं ९,७४,१०० रुपयांना विकले गेले.

सोन्यासोबत चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १९१ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ३,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,९१,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

SCROLL FOR NEXT