Gold Price Today google
बिझनेस

Gold Price Today : सोनं-चांदीच्या दरात अचानक मोठा बदल? २४, २२, १८ कॅरेटचे भाव समोर

Silver Price : २ ऑगस्ट २०२६ रोजी सोनं-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. २४,२२,१८ कॅरेट सोन्याचे तसेच चांदीचे आजचे दर, खरेदीआधी लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

जर तुम्ही आज सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल , तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. २ ऑगस्ट २०२६ रोजी सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच आजही दोन्ही मौल्यवान धातू कालच्या दरानेच विकले जात आहेत.

काल २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ४०० ची वाढ झाली होती. मात्र आज सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या असून कोणतीही वाढ किंवा घट नोंदवली गेलेली नाही.

आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोनं - १,४४,२२० प्रति १० ग्रॅम

२२ कॅरेट सोनं - १,३२,२०० प्रति १० ग्रॅम

१८ कॅरेट सोनं - १.०८.२०० प्रति १० ग्रॅम

वेगवेगळ्या शहरांमध्ये तसेच ज्वेलर्सनुसार या दरांमध्ये थोडाफार फरक असू शकतो.

चांदीचा आजचा दर

आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ किलो चांदीचा भाव २,३५,००० इतकाच कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदीचे दर स्थिर आहेत.

सोन्या-चांदीचे दर का बदलतात?

सोनं आणि चांदीच्या किंमती अनेक कारणांवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातले दर, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती, आयात शुल्क, मागणी आणि पुरवठा, विविध देशांच्या केंद्रीय बँकांची धोरणे तसेच जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय घडामोडी यांचा थेट परिणाम दरांवर होतो.

सोनं खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सोनं खरेदी करताना फक्त सोन्याचा दर पाहू नका. मेकिंग चार्ज, जीएसटी आणि BIS हॉलमार्क यांची खात्री करूनच खरेदी करा. वेगवेगळ्या ज्वेलर्सचे मेकिंग चार्ज वेगळे असू शकतात. त्यामुळे दरांची तुलना करूनच निर्णय घेणं फायदेशीर ठरेल.

सध्या सोन्याच्या किमती स्थिर असल्या तरी जागतिक बाजारातल्या घडामोडींमुळे त्यात कधीही बदल होऊ शकतो. त्यामुळे लग्न, सण किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारभाव तपासून योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनिल तटकरेंना कोण करतय टार्गेट? बड्या नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ऐन सणासुदीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन महागलं; गॅसचा भडका, टोलच्या दरातही वाढ

पुणे शिक्षक मतदारांच्या यादीत अजब घोळ, मतदाराचं नाव 'बॉम्बस्फोट', वडिलांचं नाव 'बॉम्ब'

Diabetes Blood Sugar: रक्तातील साखर अचानक कमी झाली तर काय खावं?

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

SCROLL FOR NEXT