Gold & Silver Prices meta ai
बिझनेस

Gold & Silver Prices: सोने-चांदीचा भाव वाढतच चाललाय, गेल्या ३ महिन्यांत किती रुपयांनी दर वाढले?

Gold & Silver Rate Update: गेल्या काही महिन्यांचे सोने-चांदीचे दर वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून हे दर पाहून तुम्ही थक्क व्हाल. हे दर पाहून ग्राहकांना किमती आता लाखांपर्यंत पोहोचतील अशी शक्यता भिती वाटत आहे.

Saam Tv

सध्या सोनं-चांदी खरेदी करण्याचे दिवस लवकरचं सुरू होणार आहेत. कारण एप्रिल- मे हे महिने लग्नाच्या धामधुमिचे असतात. अशातच दागिने खरेदी करणाऱ्यांना सोने-चांदीचे भाव जवळपास लाखाच्या दरात असल्याने ग्राहक नाराज आहेत. पुण्यामध्ये गेल्या तीन महिन्यात आठ हजारांनी सोन्याची किमतीत वाढ केली होती. हा आकडा पुढे कमी होण्याची ग्राहक वाट पाहत होते.

मात्र तसं न होता होळीच्या दिवसातही सोन्याच्या सोन्याच्या दराने 91 हजार पर्यंत घेतली उसळी घेतली. पुन्हा सोन्याचे दरात ७ ते ८ हजारांनी वाढ झाली आहे. हे दर पाहून ग्राहकांना हे दर लाखांपर्यंत पोहोचण्याची भिती आहे. यामध्ये फक्त सोनंचं नाही तर चांदीचे सुद्धा दर वाढले आहेत. तर पुढे आपणगेल्या तीन महिन्यातील सोने चांदीचे वाढलेले दर जाणून घेणार आहोत.

जानेवारीमधील सोने- चांदीचा दर

सोने: ८७,००० रुपये प्रति तोळा

चांदी: १ लाख २ हजार रुपये प्रति किलो

फेब्रुवारीमधील सोने- चांदीचा दर

सोने: ८५,५०० रुपये प्रति तोळा

चांदी: ९९ हजार प्रति किलो

मार्चमधील सोने- चांदीचा दर

सोने: ९१ हजार रुपये प्रति तोळा

चांदी: १ लाख ५ हजार रुपये प्रति किलो

सध्याचे सोने-चांदीचे दर

वरील प्रमाणे गेल्या काही महिन्यांचे सोने-चांदीचे वाढत दर आहेत. मात्र आता ग्राहकांसाठी या आठवड्यात एक आनंदाची बातमी आहे. कारण सोन्याचा आजचा भाव घसरला आहे. त्यामुळे तुमच्या दागिने खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम ठरू शकतो. २१ मार्च शुक्रवारी म्हणजेच आज सोने-चांदीचा भाव घसरला आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात चक्क ४४० रुपयांनी घट झाली आहे. ही घट १० ग्रॅम सोन्यावर असणार आहे.

आजचा चांदीचा दर

तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत ही ९,०३,७०० रुपये झाली आहे. हाच दर मुंबई, पुणे, जळगावमध्ये असणार आहे. तर चांदी १ ग्रॅम १०३ रुपयांना असेल. तर १०० ग्रॅम १०,३०० रुपयांना असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात कोणाच्या नशिबात धनलाभ, कोणाला करिअरमध्ये मोठी संधी? तुमची रास काय सांगते ते आत्ताच जाणून घ्या

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची विशेष सुनावणी

Malshej Ghat Closed : माळशेज घाट वाहतुकीसाठी आजही बंद; पर्यटकांचे अतोनात हाल, पर्यायी मार्ग कोणते?

Ladki Bahin Yojana: तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचे नाव यात नाही ना?

Maharashtra Politics : मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ

SCROLL FOR NEXT