Gold Rate Hike  Saam Tv
बिझनेस

Gold Rate Hike : दिवाळीनंतर सोन्याचे दर सुस्साट! काही दिवसात सोनं ४००० रुपयांनी महागलं, नवीन वर्षात काय?

Gold Price Hike Reason : लग्नसराईच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर धातूच्या किमतींदरम्यान भारतातील सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या भावात तब्बल ४००० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Why Is Gold Price Increasing In India :

दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव नरमले होते. परंतु, दिवाळीनंतर सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. अनेक भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोनं नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. अनेक गृहिणीदेखील भविष्य सुरक्षित राहावे यासाठी सोन्यात गुंतवणूक करतात.

लग्नसराईच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर धातूच्या किमतींदरम्यान भारतातील सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या भावात तब्बल ४००० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या (Gold) भावानेही सात महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी सोन्याच्या किमती १.६ टक्क्यांनी वाढून $2,069.10 प्रति औंस झाला होता. भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात केली जाते. त्यामुळे वाढत्या जागतिक किमतीचा (Price) थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर (Market) होतो.

सोन्याच्या किमतीची वाढ होण्याचे मुख्य कारणं आखाती देशातील युद्ध. इस्त्राइल-हमास युद्धाचा काही प्रमाणात परिणाम हा सोन्या-चांदीच्या दरावर दिसून आला आहे. अशातच नवीन वर्षात सोन्याचा भाव वाढणार का हा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे. आज २४ कॅरेटनुसार सोन्याचा भाव ६४,३५० रुपयांनी वाढला आहे.

डिसेंबरच्या अखेरीस सोन्याचे भाव आणखी वाढतील असे तज्ज्ञांनी मत मांडले आहे. डॉलरचा निर्देशांक घसरला, इस्त्राइल-हमास युद्ध, यूएस 10-वर्षीय रोखे उत्पन्न अडीच महिन्यांत नीचांकी पातळीवर पोहोचले, बाँड उत्पन्न ४.३% वर पोहोचले आहे. बाजारातील दर कपात आणि मोठ्या गुंतवणूकदारांची वाढलेली खरेदी यामुळे सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT