Gold price drops in Dhantrayodashi Saam
बिझनेस

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

Gold price drops in Dhantrayodashi: मागील काही दिवसांपासून सोन्यानं उच्चांक गाठला होता. मात्र, धनत्रयोदशीनिमित्त सोन्याच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे.

Bhagyashree Kamble

  • ग्राहकांसाठी खुशखबर.

  • धनत्रयोदशीला सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त.

  • चांदीच्या दरातगी कमालीची घट

सर्वत्र दिवाळीचा माहौल सुरू आहे. आज धनत्रयोदशी. या सणानिमित्त आपण सोनं हमखास खरेदी करतो. आज सोनं खरेदीचा शुभमुहूर्त मानला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. परंतु, आज सोन्याच्या दरात कमालीची घट झाली आहे. १० तोळं सोन्याच्या दरात १९,१०० रूपयांची घट झाली आहे. सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे आज सराफांच्या दुकानात ग्राहकांची सोनं खरेदीसाठी नक्कीच गर्दी पाहायला मिळेल.

आज १८ ऑक्टोबर २०२५. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,९१० रूपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,३०,८६० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १९,१०० रूपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १३,०८,६०० रूपये मोजावे लागतील. सोन्याच्या भावात घट झाल्यामुळे सामान्यांना आज सोनं खरेदी करताना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

२४ कॅरेटसह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,७५० रूपयांची घट झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,१९,९५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १७,५०० रूपयांची घट झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं खरेदीसाठी आपल्याला ११,९९,५०० रूपये मोजावे लागतील.

१८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १,४४० रूपयांची घट झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९८,१४० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात १४,४०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,८१,४०० रूपये मोजावे लागतील.

फक्त सोनं नाही तर, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीच्या दरात १ ग्रॅममागे १३ रूपयांची घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १७२ रूपये मोजावे लागतील. तर, १ किलो चांदीच्या दरात १३,००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,७२,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT