Gold- Silver Price Today Saam tv
बिझनेस

Gold Price: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १० तोळा सोनं ५४०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी महत्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली तर चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत वाचून जा....

Priya More

Summary -

  • आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली

  • आज चांदीच्या दरात वाढ झाली

  • २४ कॅरेट १ तोळा सोनं ५४० रुपयांनी स्वस्त झालं

  • आज १ किलो चांदीच्या दरात ३००० रुपयांनी वाढ झाली

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पण चांदीचे दर मात्र वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. पण आज सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५४० रुपयांनी घट झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ५४० रुपयांनी घट झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,३०,१५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ५,४०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १३,०१,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. मंगळवारी हेच सोनं १३,०६,९०० रुपयांना विकले गेले.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१९,३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ५,००० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,९३,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हेच सोनं शुक्रवारी ११,९८,९०० रुपयांना विकले गेले होते.

तर २४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४१० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९७,६१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४,१०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,७६,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. शुक्रवारी हेच सोनं ९,८०,२०० रुपयांना विकले गेले. सोन्याच्या दरात मोठी घट झाल्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

एकीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १९० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ३,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,९०,००० रुपये खर्च करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan - Dombivali : कल्याण-डोंबिवलीतील वादावर पडदा पडणार? एकनाथ शिंदे - रवींद्र चव्हाण येणार एकाच मंचावर| VIDEO

Karlyachi Bhaji Recipe: कारल्याची चविष्ट रस्सा भाजी कशी बनवायची?

Maharastra Politics: महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीचा मोठा निर्णय; घटक पक्षातील नेते अन् पदाधिकाऱ्यांना 'नो एन्ट्री'

Maharashtra Live News Update: शरद पवार घेणार बाबा आढाव यांची भेट

Satbara: मोठा निर्णय! आता १०० वर्षांपूर्वीचाही सातबारा काढता येणार; एका क्लिकवर होणार सर्व कामं

SCROLL FOR NEXT