आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरणीचा कल असलेल्या सराफा बाजाराने आज अचानक यू-टर्न घेतलेला यामध्ये पाहायला मिळाला, डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे.
आज सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली, तर चांदीच्या दराने मोठी झेप घेत एका दिवसात तब्बल ₹९ हजारांची वाढ नोंदवली. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांचे बजेटही कोलमडले आहे.
तसेच GoodReturn नुसार, आज २४ कॅरेट १० तोळं सोनं १७,५०० रुपयांनी वाढलेलं आहे. सोन्याच आजचे ताजे दर २४ कॅरेट १ ग्रॅम १४,५७५ रुपये आहे, ८ ग्रॅमचा दर १,१६,६०० आणि १० ग्रॅम सोन्याची किंमत १,४५,७५० रुपये इतकी आहे. तर आज चांदीच्या किंमतीतही बदल झालेला पाहायला मिळाला आहे. १ ग्रॅम चांदीची किंमत २४०, ८ ग्रॅम १,९२० तर १० ग्रॅम चांदीचे दर २,४०० रुपये आहे.
सोने तज्ज्ञ किरण पाटील यांच्या मते, आजचा जीएसटीविना दर पाहता, सोने प्रति किलो ₹१,४५,०००, तर चांदी प्रति किलो ₹२,२८,००० इतकी नोंद झाली आहे. सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची मजबुती आणि गुंतवणूकदारांचा वाढलेला कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात ही तेजी दिसून आली आहे. आगामी काही दिवसांतही दरात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.